Battery Operated Sprayer Pump : बॅटरी संचलित फवारणी पंप साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ
Battery Operated Sprayer Pump : शेतकरी बांधवांना 100% अनुदांनावरती नॅनो युरिया, डीएपी, बॅटरी संचलित फवारणी पंप वितरण करण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू होते. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ही 30 जून पर्यन्त होती. त्यानंतर दिनांक 24 जुलै रोजी नॅनो युरिया, डीएपी, घटकाची सोडत यादी काढण्यात आली आहे. परंतु बॅटरी संचलित फवारणी पंप साठी अद्याप सोडत यादी काढण्यात आली नाही. तर, फक्त बॅटरी संचलित फवारणी पंप साठी आता कृषि विभागाकडून शेतकर्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.
सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.
सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगाम मध्ये खालील निविष्ठा १०० % अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. मागील १० दिवसापासुन अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू असुन सद्यस्थितीत अर्जांची संख्या खूप कमी प्रमाणात असल्यामुळे दि. 31 ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यास वाढीव मुदत देण्यात येत आहे.
बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप, (१००% अनुदानावर ) (Battery Operated Sprayer Pump)
(अर्ज करण्याचा कालावधी 31 ऑगस्ट २०२४ पर्यंत )
वरील बाबीचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने सोडत करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
अर्ज करणेची पध्दत :- (Battery Operated Sprayer Pump)
1. भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
लाभार्थी शेतकरी यांचे युजर आयडी व पासवर्ड टाकणे आणि लॉगिन करणे
2. अर्ज करा बाबीवर क्लिक करणे
3. कृषि यांत्रिकीकरण -> बाबी निवडा यावर क्लिक करणे
4. मुख्य घटक बाबीवर क्लिक करणे –» कृषि यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य
5. तपशिल बाबीवर क्लिक करून – मनुष्यचलीत औजारे घटक निवडणे
6. यंत्र/औजारे व उपकरणे बाबीवर क्लिक करून – पिक संरक्षण औजारे निवडणे
7. मशीनचा प्रकार बाबीवर क्लिक करून बॅटरी संचलीत फवारणी पंप ( गळीतधान्य)/कापूस निवडणे
8. अर्ज जतन करणे आणि मेन्यू वर जाऊन अर्ज सादर करणे.
बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप, (१००% अनुदानावर )
(अर्ज करण्याचा कालावधी 31 ऑगस्ट २०२४ पर्यंत )