Crop Insurance : पीक विमा अर्ज मंजूर झाला का? | अर्ज त्रुटि मध्ये तर आला नाही ना …असे पहा स्टेटस
Crop Insurance : खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात आले होते. शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै देण्यात आली होती. तर, राज्याती बर्याच शेतकर्यांनी आपला पीक विमा अर्ज ऑनलाइन सेतु सुविधा केंद्र च्या माध्यमातून सादर केले होते.
तर, आता हे ऑनलाइन सादर केलेले अर्ज विमा (Crop Insurance) कंपनी कडून तपासणी सुरू झालेली आहे. यामध्ये ज्या शेतकर्यांचे अर्ज त्रुटि मध्ये आले आहेत त्यांनी सात दिवसांत आपण ज्या ठिकाणी विमा भरला होता तेथून त्रुटि पूर्तता करून विमा अर्ज सादर करणे आवश्यक आहे अन्यथा पुढे विमा मंजूर झाला तर असे त्रुटि मधील अर्ज पात्र ठरणार नाहीत.
विमा कंपनीकडून विमा अर्ज तपासणी सुरू झाली आहे त्यामध्ये ज्यांचे अर्ज त्रुटि मध्ये आले आहेत त्यांना खालील प्रमाणे संदेश पाठविण्यात येत आहेत. (Crop Insurance)
तर, वरील संदेश प्राप्त झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी विमा भरला आहे त्या ठिकाणी आपल्या अर्जाची त्रुटि बाबत चौकशी करून त्रुटि पूर्तता करून घ्यावी.
अर्ज मंजूर झाला की नाही कसे पहायचे ? (Crop Insurance)
जर आपल्याला आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे तपसायचे असेल तर आपण खालील लिंक वर भेट देऊन पुढे Application Status वरती क्लिक करावे आणि आपला विमा पावती क्रमांक टाकून आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता.
आपला अर्ज मंजूर झाला असेल तर अश्या प्रकारचे स्टेटस दिसेल >>
* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?
* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू
* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू
* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे
* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…
* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस
* “या” तारखेपासून शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान
* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज