Ladki bahin yojana update : “या” लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले जाणार ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Ladki bahin yojana update : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले होते. या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जात आहेत. तर, हे पैसे लाभार्थी महिला यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये जमा येत आहेत.

 

ladki bahin yojana update
ladki bahin yojana update

 

लाडकी बहीण योजने च्या नियमांमध्ये न बसणाऱ्या महिलांना आता पैसे परत घेण्याची भीती वाटत आहे करत आता पडताळणी मोहीम राज्यात राबविली जाण्याची शक्यता आहे. परंतु, पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून 4000 पेक्षा अधिक महिलांनी ‘योजना नको’ असा अर्ज केला आहे. (Ladki bahin yojana update)

 

 

महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयांत योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज प्राप्त होत आहेत. पडताळणी मोहीम मध्ये अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने हे अर्ज माघार घेण्याचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे.

 

 

महिला व बालविकास मंत्री यांची प्रतिक्रिया काय? (Ladki bahin yojana update)

 

योजना थांबवण्यासाठी महिला ह्या स्वतःहून अर्ज करत असल्याच्या प्रकारावर मा मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “काही महिलांनी लाभ परत देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यातही काही अर्ज आले होते. या महिन्यातही हे अर्ज येत आहेत. आपण या योजनेसाठी पात्र नाही, असं लक्षात आल्याने काही महिला अर्ज भरून योजनेचा लाभ नाकारत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी प्रामाणिकसुद्धा आहेत, हे यातून सिद्ध होतंय”, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

 

 

पुढे त्या म्हणाल्या की , “आतापर्यंत 4000 अर्ज आले आहेत. परंतु, ही आकडेवारी अंदाजे आहे. डिसेंबरमध्ये 100 – 150 अर्ज प्राप्त झाले होते. जानेवारीत जास्त प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे. या महिलांकडून परत आलेला निधी पुन्हा सरकारी तिजोरीत देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र रिफंड हेड तयार करून त्या निधीचा उपयोग लोककल्याणासाठी केला जाणार आहे”. (Ladki bahin yojana update)

 

 

तसेच, “पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारक प्राप्त लाभार्थी महिला वगळता इतर महिलांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. याकरता परिवहन आणि प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जात आहे. त्यामुळे ही अखंड अविरत सुरू राहणारी प्रक्रिया असेल. परिणामी अर्ज मागे घेण्याऱ्या महिलांच्या आकडेवारीत सतत बदल होऊ शकेल. ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचे जुलैपासून दिलेल्या हप्त्यांचे पैसे परत घेतले जातील आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये जमा केले जातील,” अशी भूमिका माननीय मंत्री यांनी मांडली आहे.

 

 

अशाच नवीन अपटेड मिळविण्याकरिता ग्रुप ला जॉइन व्हा

 

 

हे पण पहा :

 

* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…

* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?

* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

 

Tags : Ladki bahin yojana update, ladki bahin maharashtra, ladki bahin 2025 update, 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!