Magel Tyala Saur Krushi Pump Yojana MTSKPY : मागेल त्याला सौर कृषी पंप ऑनलाइन अर्ज सुरू | येथे करा ऑनलाइन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.4/5 - (7 votes)

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana MTSKPY : सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महारष्ट्रात सन २०१५ पासून सौर कृषीपंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यापूर्वी अटल सौर कृषीपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यात आली होती. तसेच सद्यपरिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक – ब योजने अंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येत आहे. राज्यात दि. ०६.०९.२०२४ रोजी पर्यंत 2,63,156 सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषीपंपा बाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे. (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana MTSKPY)

 

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Mtskpy

 

 

योजनेची ठळक वैशिष्टे (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana MTSKPY)

 

शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना

सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच

अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के

उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान

जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप

पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह

वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही

सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा

 

 

लाभार्थी निवडीचे निकष

 

२.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील. (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana MTSKPY)

 

वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.

 

ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत. 

 

अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील. (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana MTSKPY)

 

 

 

ऑनलाइन अर्ज कोठे करावा?

 

या योजने अंतर्गत नवीन सौर कृषीपंप मिळण्याकरीता महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. वेबपोर्टलवरुन किंवा https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या link वर जाऊन, अर्जदारास A-1 अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करवयाचे आहे.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महावितरण पोर्टल लिंक : येथे भेट द्या

 

आवश्यक कागदपत्रे?

 

शेतक-यांकडे असलेल्या शेतीचा 7/12 उतारा (जाल्स्त्रोताची नोंद आवश्यक आहे),

आधारकार्ड,

जातीचे प्रमाणपत्र (अनुसुचित जाती/ जमाती लाभार्थींसाठी) या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे.

अर्जदार स्वत: शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे.

पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

या व्यतिरिक्त संपर्काकरीता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता (असल्यास), पाण्याचे स्त्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.

 

 

पंप साठी कीती रक्कम भरावी लागेल?

 

सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडुन सौर कृषी पंप किंमतीच्या 10 टक्के रक्कम व अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांकडुन सौर कृषी पंप किंमतीच्या 5 टक्के एवढी रक्कम भारवी लागेल.

 

 

ऑनलाइन अर्ज येथे करा

 

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना माहिती पुस्तिका : डाऊनलोड करा

 

Tags : मागेल त्याला सोलर पंप योजना, mtskpy, Magel Tyala Saur Krushi Pump Yojana MTSKPY, pmkusum, कुसुम_सोलर, kusumscheme, kusum-solar-pump

error: Content is protected !!