Magel Tyala Solar Pump Yojana : सोलर पंप कंपनी निवडण्याची प्रक्रिया सुरू … तुम्हाला आला का हा ऑप्शन?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4.3/5 - (6 votes)

Magel Tyala Solar Pump Yojana : सौर ऊर्जेचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महारष्ट्रात सन २०१५ पासून सौर कृषीपंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यापूर्वी अटल सौर कृषीपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना राबविण्यात आली होती.

 

तसेच सद्यपरिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक – ब योजने अंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येत आहे. राज्यात दि. ०६.०९.२०२४ रोजी पर्यंत 2,63,156 सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषीपंपा बाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे. (Magel Tyala Solar Pump Yojana)

 

तर आता मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी(Magel Tyala Solar Pump) शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट मिळली आहे. तर, यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया शुल्क भरले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी आता वेंडर (कंपनी) निवडीचा (Vender Option) पर्याय उपलब्ध झाला आहे.

 

ज्या शेतकरी बांधवांनी मागेल त्याला सोलर पंप योजनेचे अर्ज भरले होते व तसेच अर्ज भरल्यानंतर पेमेंट प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्ज सबमिट झाला आहे, असे अर्ज पडताळणी करून आता त्या शेतकऱ्यांना आता वेंडर/कंपनी निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रथम टप्प्यात एकूण 14 वेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या उपलब्धतेनुसार वेंडर निवडता येणार आहे. (Magel Tyala Solar Pump Yojana)

 

 

वेंडर निवड प्रक्रिया कशी करावी? (Magel Tyala Solar Pump Yojana)

 

स्टेप 1 : सर्वप्रथम महावितरणच्या या https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php  अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा

 

स्टेप 2 : महावितरणच्या पोर्टलवर जाऊन “लाभार्थी सुविधा हा पर्याय निवडा. लाभार्थी सुविधा पर्यायात अर्जाची सद्यस्थिती तपासा. आपला अर्ज क्रमांक टाका. आपल्या एमटी आयडी / एमएस आयडी / एमके आयडी या क्रमांकाचा वापर करून अर्जाची माहिती शोधा.

 

स्टेप 3 : त्यांनतर तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल. आपले पेमेंट पूर्ण झालेले दिसेल.

 

स्टेप 4 : यानंतर वेंडर निवड करा वेंडर निवडीसाठी उपलब्ध यादी तुम्हाला दिसेल. तुमच्या जिल्ह्यात जिथे वेंडर उपलब्ध असेल त्याची यादी तुम्हाला दिसेल.

 

स्टेप 5 : तुमच्या पसंतीचा वेंडर निवडून Assign Vendor पर्यायावर क्लिक करा. यानंतर ओटीपी प्रक्रिया पूर्ण करा वेंडर निवडल्यानंतर आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल, जो सबमिट करून वेंडर निवड प्रक्रिया पूर्ण करा.

 

 

तुमच्या जिल्हात त्या vendor ने कसे काम केले आहे आणि कुठे इन्स्टॉलेशन केले आहे, ती सर्व माहिती तुम्हाला मिळेल. वरील सर्व प्रोसेस केल्यावर तुमची vendor selection होणार आहे.

 

 

Tags :  magel tyala saur krushi pump yojana, magel tyala saur, magel tyala solar pump yojana, magel tyala krushi pump yojana, magel tyala saur krushi pump, 

 

 

हे पण पहा :

 

* रब्बी हंगाम ई पीक पाहणी सुरू

* हरभरा, गहू, कांदा विम्या साठी 15 डिसेंबर पर्यन्त मुदत

* आता व्हॉट्सॲप वर मिळवा पीक विमा स्टेटस, पीक नुकसान सूचना सद्यस्थिती

* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना

* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!