Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना चे पैसे खात्या मध्ये आले नाही? तात्काळ हे काम करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
2.3/5 - (3 votes)

Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे या योजनेचे ऑनलाइन अर्ज हे स्वीकारणे सुरू आहे. सध्या राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे तर या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये हे दिले जाणार आहेत. तर, हे पैसे लाभार्थी महिला यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये जमा करण्यास आज दिनांक 14 ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली आहे.

 

Majhi Ladki Bahin Yojana Amount

 

तर, आता शासनाने कोणतेही अनुदान वितरण करत असताना त्यांच्या आधार शी संलग्न बँक खात्या मध्ये च वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज करत असताना आपण जे खाते दिले आहे ते आधार शी संलग्न असणे गरजेचे आहे. तर आता लाडकी बहीण योजना 3,000 रु. बँक खात्या मध्ये जमा करण्यास सुरुवात झाली आहे. (Majhi Ladki Bahin Yojana)

 

 

दिनांक 14 ऑगस्ट रोजी ज्या महिलांचे ऑनलाइन अर्ज हे पात्र करण्यात आले होते त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित रु.3000/- हे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्या मध्ये जमा करण्यात आले आहेत.

 

 

हे वितरण 14 ऑगस्ट पासून सुरू झाले असून उर्वरित पात्र महिलाना देखील 17 ऑगस्ट पर्यन्त ही रक्कम त्यांच्या बँक खात्या मध्ये वितरित करण्यात येणार आहे. (Majhi Ladki Bahin Yojana)

 

हे काम करा ? Majhi Ladki Bahin Yojana

 

तर, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु त्यांच्या खात्या मध्ये रक्कम जमा झाली नाही त्या महिलांनी तात्काळ खालील काम करून घ्यावे.

 

1. आपल्या आधार कार्ड शी आपले बँक खाते लिंक आहे का? हे तपासून पहावे

 

2. बँक खाते आधार शी लिंक नसेल तर ते बँकेत जाऊन लिंक करून घ्यावे

 

3. किंवा आपण आपल्या भागातील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपले इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे नवीन खाते उघडू शकता….हे खाते उघडल्या नंतर हे आपल्या आधार शी लिंक होईल.

 

4. आणि जर आपले खाते आधार शी लिंक असेल तर आपण 17 ऑगस्ट पर्यन्त वाट पहावी ...वितरण प्रक्रिया सुरू आहे.

 

 

आधार ला कोणते बँक खाते लिंक आहे? असे तपासा

 

 

error: Content is protected !!