Pik karj : आता शेतकर्यांना सीबील शिवाय मिळणार पीक कर्ज | CIBIL Score for Crop Loan
Pik karj : प्रत्येक हंगामात शेतकर्यांना पीक कर्ज वाटपाच्या वेळी बँक कडून सीबिलची अट घातली जाते. त्यामुळे शेतकर्यांना सीबील स्कोर कमी असल्यामुळे ह्या बँक पीक कर्ज नाकारतात. तर, यावर्षी देखील बँकांनी शेतकर्यांना पीक कर्ज देतानी सीबील स्कोर ची अट घातली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना पीक कर्ज मिळण्यास अडचण होत आहे. (CIBIL Score for Crop Loan)
परंतु, या प्रकरणात आता राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकावर एफआयआर दाखल करणार असल्याचा इशारा दिलेला आहे. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत दिनांक 25 जून रोजी मुंबईतील सह्याद्री अतिगृहावर खरीप हंगाम बैठक आयोजित करण्यात आली होती तर या बैठकीनंतर यावेळी उपमुख्यमंत्री यांनी शेतकर्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकावर एफआयआर दाखल करणार असल्याचा इशारा दिलेला आहे. या बैठकीस कृषीमंत्री, तसेच रिझर्व्ह बँक, नाबार्ड आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
तर, उपमुख्यमंत्री यांनी शेतकर्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकावर एफआयआर दाखल करण्यात येईल असे उपस्थित बँकेचे अधिकारी यांना इशारा दिला आहे. तर, आता खरच राज्यातील बँक शेतकर्यांना सीबील स्कोर न पाहता कर्ज देणार का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.