PoCRA 2.0 Update : पोक्रा प्रकल्प टप्पा-2 लेखा शीर्षास मान्यता मिळाली…. लवकरच योजना सुरू होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

PoCRA 2.0 Update : जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या प्रकल्पात राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली तर विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खानदेशातील जळगाव व नाशिक अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित 6000 कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यात येणार आहे. (Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp PoCRA 2.0 Update)

 

 

प्रकल्पाच्या टप्पा दोनमध्ये (PoCRA 2.0) समाविष्ट करण्यासाठी गावांसाठीचे निकष निर्धारित करुन त्यानुसार गावांच्या निवडीबाबतची प्रक्रिया पूर्ण करुन निवड केलेल्या एकूण 6959 गावांच्या यादीस मान्यता देण्यात आली आहे.

 

 

तर या २१ जिल्ह्यातील गावांच्या निवडीस शासन निर्णय अन्वये मान्यता मिळालेली आहे. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या अधिकारी/ कर्मचारी (विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक) यांचेमार्फत करावयाची आहे. (PoCRA 2.0 Update)

 

 

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-२ ची अंमलबजावणी विहित वेळेत व सुरळीत होण्यासाठी तसेच प्रकल्पाचे कार्यालयीन कामकाज सुरळीतपणे सुरु होण्याच्या दृष्टीने प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना विभाग प्रमुख तसेच नियंत्रक अधिकारी व वित्त विशेषज्ञ (उपसंचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा) यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा-२ करिता नविन लेखाशिर्षास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार मान्यता देण्यात आली आहे. 

 

 

PoCRA 2.0 Update

 

 

PoCRA 2.0 Update 202501071757570701 Page 2

 

 

दुसर्‍या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी

 

 

पोक्रा 2.0 गावे यादी :  14-10-2024 शासन निर्णय

 

 

Tags : pocra, dbt pocra, pocra dbt, pocra – nanaji deshmukh krushi sanjivani prakalp, pocra 2.0 update, pocra 2.0 village list, pocra village list, 

 

 

हे पण पहा :

 

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

* पोक्रा प्रकल्प टप्पा-2 अमलबजावणी सुरू….

* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!