Soyabin Kapus anudan 2023 : “या” राहिलेल्या शेतकर्यांना लवकरच मिळणार अनुदान | सोयाबीन कापूस अनुदान 2023
Soyabin Kapus anudan 2023 : राज्यामध्ये कापूस व सोयाबीन शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे आणि अनुदान वितरण साठी पोर्टल तयार करण्यात येऊन वितरणाची कार्यवाही करण्यात आली आहे.
या योजनेमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात हेक्टरी 5000/-रुपये मदत जमा करण्याचा निर्णय शासनाने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या आणि या यादीतील वैयक्तिक शेतकऱ्यांने त्यांच्या आधार क्रमांकाची माहिती कृषि विभागाकडे देणे बंधनकारक होते. तसेच सामाईक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी म्हणजेच सामाईक खातेदार त्यांच्यातील कोणत्याही एका शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याबाबत संमतिपत्र देणे सक्तीचे करण्यात आले आहे. (Soyabin Kapus anudan 2023)
परंतु, एकूण ९६ लाखांपैकी २४ लाख शेतकऱ्यांनी संमतिपत्रेच कृषि विभागाकडे सादर केलेली नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा, अशा पेचात कृषी विभागाची यंत्रणा पडली आहे.
कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणा मधील महत्वाचा घटक म्हणजे कृषि सहाय्यक यांनी सातत्याने पाठपुरावा करीत राज्यभर ७२ लाख शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण केली आहे. यातील ५३ लाख शेतकऱ्यांची पूर्ण माहिती प्राप्त झालेली आहे. परिणामी, त्यांच्या बॅंक खात्यात मदतीपोटी आतापर्यंत 2578 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. यातील अजून 4 लाख शेतकऱ्यांना मदत देणे बाकी असून, निवडणूक आचारसंहिता समाप्त होताच अंदाजे १०० कोटी रुपये राज्यभर वाटले जाण्याची शक्यता आहे. (Soyabin Kapus anudan 2023)
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, मदत न मिळू शकलेले अंदाजे २४ लाख शेतकरी हे बहुतांश संयुक्त खातेदार आहेत. संयुक्त खात्यांमध्ये अनेक भागांमध्ये वाद आहेत. त्यामुळे मदत जमा करण्यासाठी कोणत्याही एका खातेदाराला संमती देण्यास इतर खातेदार तयार नसतात. परिणामी, मदत वाटप रखडले आहे.
कृषी आयुक्त यांच्याकडून कापूस, सोयाबीन मदतवाटप प्रक्रियेचा नुकताच आढावा घेण्यात आला. कृषी विभागाकडून शक्य होत असलेले मदत वाटपाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. (Soyabin Kapus anudan 2023)
उर्वरित 4 लाख शेतकऱ्यांना लवकरच मदत (Soyabin Kapus anudan 2023)
आधार संलग्नतेची संमती दिलेल्या ७२ लाख शेतकऱ्यांपैकी अद्याप 4 लाख शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही तर ही मदत निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वितरित केली जाणार आहे असे कृषि विभागा कडून सांगण्यात आले होते. तर, आता निवडणूक झाल्या असून पुढील काही दिवसांत राहिलेल्या शेतकर्यांना हे अनुदान मिळणार आहे.
सामाईक खातेदार यांनी संमतीपत्र सादर करावेत
तर, ज्या खातेदारांचे नाव सामाईक खातेदार यादी मध्ये आहे त्यांनी आपले सामाईक खातेदार ना हरकत व संमती पत्र हे एफिडेविट स्वरुपात कृषि कार्यालयात लवकर सादर करावेत. तसेच, ज्या शेतकर्यांनी एफिडेविट सादर केले आहेत त्यांनी हे अनुदान मिळण्यासाठी आपली ekyc करून घ्यावी. कारण, ekyc केली तरच हे अनुदान मिळणार आहे.
त्यामुळे, ज्या सामाईक खातेदार शेतकर्यांनी एफिडेविट सादर केले आहेत त्यांनी हे अनुदान मिळण्यासाठी आपली ekyc तात्काळ करून घ्यावी.
Tags : soyabin_kapus_anudan_2023, soyabin_cotton_subsidy, bhavantar_yojana_maharashtra_gov, farmer_schemes_maharashtra_government,
* आपल्या गावाची मतदार यादी पहा…PDF डाऊनलोड करा | विधानसभा 2024
* 34 जिल्हयांची लाभार्थी यादी डाऊनलोड करा | पीएम कुसुम सौर पंप योजना
* तुम्हाला पण आला आहे का हा ऑप्शन? लाडकी बहीण योजना अपडेट
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले, पेमेंट करावे का?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान
* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे
* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर