महाडीबीटी पोर्टल द्वारे दिनांक 11 मार्च 2024 रोजी कृषि यांत्रिकीकरण तसेच शेततळे, तुषार ठिबक साठी सोडत काढण्यात आली होती. परंतु, आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्या सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पूर्व संमती मिळेल की नाही याबाबत शंका होती तर ती शंका आता दूर झाली आहे.

तर, दिनांक 18 मार्च 2024 रोजी मा. कृषि संचालक, कृषि आयुक्तालय यांच्या अध्यक्षतेखाली कृषि यांत्रिकीकरण विषयी आढावा बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये कृषि अधिकारी व कर्मचारी ऑनलाईन उपस्थित होते तसेच, सभेमध्ये झालेली चर्चा व त्यावर काही निर्देश देण्यात आले आहेत.

“राष्ट्रीय कृषि विकास योजना कृषि यांत्रिकीकरण, तसेच राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेची लॉटरी दि.११/०३/२०२४ रोजी काढण्यात आलेली आहे आणि राज्यात आचारसंहिता दि. १६/०३/२०२४ रोजी लागू झाली आहे तर सदर योजना ही कार्यरत असल्याने निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यास हरकत नाही” त्यामुळे पुढील कार्यवाही सुरू ठेवावी असे निर्देश दिलेले आहेत.