Soybean Chlorosis : सोयाबीन पिवळे पडतेय? मग असे करा एकात्मिक व्यवस्थापन | सोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस)

शेतकरी बांधवानो यावर्षी बऱ्याच ठिकाणी वेळेवर पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे. परंतु मोजकाच पाऊस पडून त्यानंतर पावसाची उघडीप झालेली असून त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीन सुरवातीलाच रोप अवस्थेत च पिवळे- पांढरे पडत आहे.

लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. क्लोरासीस हि जमिनीत लोहाची (फेरसची) कमतरतेमुळे होत नसून ती काही कारणाने झाडांद्वारे लोह शोषण न केल्याने होते.