Yojana Doot Bharti : मुख्यमंत्री योजनादूत ऑनलाइन अर्ज सुरू | राज्यात एकूण 50000 जागा | योजनादूत भरती 2024
Yojana Doot Bharti : राज्यातील तरुणांना दरमहा १० हजार रूपये कमविण्याची सुवर्णसंधी राज्य सरकारच्या या मुख्यमंत्री योजनादूत च्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती ही सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम हा राज्यात राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर 01 तर शहरी भागात प्रत्येक 5000 लोकसंख्येमागे 01 अशा पद्धतीने राज्यात एकूण 50,000 योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. (Yojana Doot Bharti)
या योजनादूतांना दरमहा 10,000/- रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देणार आहेत. (Yojana Doot Bharti)
पात्रता (Yojana Doot Bharti)
१) या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा.
२) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
३) उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
४) उमेदवारास संगणक ज्ञान असावे.
५) अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आवश्यक.
६) आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
१) मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज.
२) आधार कार्ड.
३) पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे/प्रमाणपत्र इ.
४) अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला)
५) उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा
६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
७) हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०२४
अर्ज कुठे कराल?
योजना दूत साठी इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.