PM Kisan Fraud App : शेतकर्‍यांनो सावध रहा | फसव्या पीएम किसान अॅप पासून सावध रहा अन्यथा तुमचे पण बँक खाते होणार रिकामे

शेतकरी बांधवानो व्हाट्सअॅप च्या माध्यमातून फसव्या पीएम किसान अॅप लिंक पासून सावध रहा अन्यथा तुमचे पण बँक खाते होणार रिकामे होऊ शकते.

नुकतेच राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आला आहे. परंतु काहि शेतकर्‍यांना हा हफ्ता मिळाला नसून त्याची वितरण प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आपल्या ला हफ्ता मिळाला की नाही हे पाहण्यासाठी काही सायबर भामटे हे शेतकर्‍यांना फ्रौड पीएम किसान अॅप ची लिंक पाठवून ते मोबाइल मध्ये इंस्टॉल करण्यास सांगतात आणि त्याद्वारे ते बँक तपशील, otp सर्व संदेश त्यांच्याकडे घेतात. आणि त्याद्वारे ते संबधित शेतकर्‍याच्या बँक खात्यामधून पैसे काढून घेतात.

याच दरम्यान, राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील 5 शेतकऱ्यांची अशा प्रकारे मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलेले आहे. झाले असे की, व्हॉट्सअॅपवर त्यांना पीएम किसान अॅपची लिंक पाठविण्यात आली आणि त्यांच्या खात्यातून एकूण 7 लाख रुपये काढून घेण्यात आले आहेत.

अधिक माहिती