PM Kisan Fraud App : शेतकर्‍यांनो सावध रहा | फसव्या पीएम किसान अ‍ॅप्लिकेशन पासून सावध रहा अन्यथा तुमचे पण बँक खाते होणार रिकामे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

PM Kisan Fraud App : शेतकरी बांधवानो व्हॉट्सॲप च्या माध्यमातून फसव्या पीएम किसान ॲप लिंक पासून सावध रहा अन्यथा तुमचे पण बँक खाते होणार रिकामे होऊ शकते.

 

pmkisan

 

नुकतेच राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आला आहे. परंतु काहि शेतकर्‍यांना हा हफ्ता मिळाला नसून त्याची वितरण प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आपल्या ला हफ्ता मिळाला की नाही हे पाहण्यासाठी काही सायबर भामटे हे शेतकर्‍यांना फ्रौड पीएम किसान ॲप ची लिंक पाठवून ते मोबाइल मध्ये इंस्टॉल करण्यास सांगतात आणि त्याद्वारे ते बँक तपशील, otp सर्व संदेश त्यांच्याकडे घेतात. आणि त्याद्वारे ते संबधित शेतकर्‍याच्या बँक खात्यामधून पैसे काढून घेतात. (PM Kisan Fraud App)

 

 

याच दरम्यान, राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील 5 शेतकऱ्यांची अशा प्रकारे मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलेले आहे. झाले असे की, व्हॉट्सॲप त्यांना पीएम किसान ॲप लिंक पाठविण्यात आली आणि त्यांच्या खात्यातून एकूण 7 लाख रुपये काढून घेण्यात आले आहेत. (PM Kisan Fraud App)

 

 

त्यामुळं आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी ही सावध करणारी बातमी आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगावमध्ये शेतकर्‍यांना मोबाईलवर पीएम किसान ॲप ची बनावट लिंक पाठवून सायबर भामट्यांनी 5 शेतकऱ्यांच्या खात्यातील 7 लाख रुपयांची रक्कम लंपास केली आहे.

 

 

तर या शेतकर्‍यांना बँकेत असलेल्या खात्यामधून अचानक पैसे डेबिट होत असल्याचे संदेश आल्यानं शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली, त्यानंतर शेतकऱ्यांनी हिंगोलीच्या पोलीस मुख्यालयातील सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

 

 

तर, सर्व शेतकरी बांधवांनी व्हॉट्सॲप वर पाठविण्यात आलेल्या अशा लिंक किंवा ॲप वर क्लिक करू नये आणि तसेच व्हॉट्सॲप वर पाठविण्यात आलेले कोणतेही अण्ड्रोइड ॲप मोबाइल वर इंस्टॉल करू नये. (pm kisan status check 2024)

 

सर्व शेतकरी बांधवांनी याबाबत ची काळजी घ्यावी.

 

खालील प्रमाणे अण्ड्रोइड ॲप मोबाइल वर पाठविले जाते तर असे कोणतेही अण्ड्रोइड ॲप मोबाइल वर इंस्टॉल करू नका. 

 

PM Kisan Fraud App
PM Kisan Fraud App

 

 

PM Kisan Fraud App

 

 

pm kisan status check 2024

 

 

Pm Kisan Fraud Alert

error: Content is protected !!