Posted in

Crop Insurance Claim : तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे का नाही? असे तपासा ऑनलाइन

Crop insurance claim
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Crop Insurance Claim : महाराष्ट्र शासनाने नुकताच खरीप हंगाम २०२४ आणि रब्बी हंगाम २०२४-२५ चा पिक विमा वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. जर तुम्ही पण खरीप हंगाम 2024-25 मध्ये पीक विमा भरला असेल तर तुमचा पिक विमा मंजूर आहे का आणि मंजूर असेल तर किती रक्कम मंजूर आहे, याबाबत आपण मोबाईलवरून कसं पाहायचं, हे या लेखात पाहणार आहोत. Crop Insurance Claim

 

असे तपासा तुमचा पीक विमा Crop Insurance Claim

 

>> सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जे ब्राउझर वापरत असाल, म्हणजेच क्रोम, गुगल किंवा इतर या ब्राउझरवर जाऊन PMFBY म्हणजेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना हे सर्च करायचा आहे.

>> यानंतर तुम्हाला समोर पीक विमा योजनेची अधिकृत वेबसाईट दिसून येईल. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अनेक प्रकारचे पर्याय दिसून येतील.

>> यातील Farmer Corner या पर्यायावर क्लिक करावे.

>> फार्मर कॉर्नरवर गेल्यानंतर लॉगिन करणे आवश्यक आहे.  यातील लॉगिन फॉर फार्मर या पर्यायावर क्लिक करायचा आहे. Crop Insurance Claim

Crop insurance claim 1

 

>> पुढे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅपच्या कोड दिलेला आहे, तो टाकायचा आहे.  त्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी एंटर करायचा आहे.  Crop Insurance Claim

 

>> यानंतर आपल्यासमोर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती दिसून येईल. शेतकऱ्याचे नाव, पॉलिसी नंबर यासह इतर माहिती दिसून येईल.

 

>> पॉलिसी नंबरच्या ठिकाणी पॉलिसीची माहिती दिसून येईल. जर समजा तुम्ही खरीप 2024 ची पॉलिसी घेतली असेल तर ती पाहता येईल.

 

>> त्या पॉलिसीवर क्लिक केल्यानंतर त्याबद्दलची माहिती पाहता येईल.  हे पाहत असताना शेवटी तुम्हाला View या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

Crop insurance claim 2

>> यानंतर आपल्यासमोर दुसरी विंडो ओपन होणार आहे. त्यामध्ये संबंधित पॉलिसीबाबत माहिती दिली जाते, पॉलिसी कॅल्क्युलेशन झाले आहे की नाही ते दाखवले जाते.  पॉलिसी कॅल्क्युलेशन झाले असेल तर पुढे नुकसानीची टक्केवारी, पीक विम्याची रक्कम किती मंजूर झाले आहे, ते दाखवले जाते.

>> अशा पद्धतीने तुम्ही काही मिनिटांमध्ये तुमचा पिक विमा मंजूर आहे की नाही, आहे तर किती भरपाई मिळणार आहे, याबाबतची माहिती काही मिनिटात मोबाईलद्वारे घेता येईल. Crop Insurance Claim

 

तुमचा विमा तपासण्या साठी येथे भेट द्या : विमा पोर्टल Farmer Corner

 

 

 

हे पण पहा :

* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा

* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना

* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर

* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?

* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?

* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू

* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?

 

error: Content is protected !!