Mahareshim Abhiyan 2026 : रेशीम उद्योग हा कृषि व वन संपत्तीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. महाराष्ट्रातील हवामान या उद्योगास पोषक असल्यामुळे रेशीम उत्पादन करण्यास राज्यात भरपूर वाव आहे.
राज्याचा कृषि विकास दर वृध्दीबरोबर ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिकस्तर व जीवनमान उंचावण्यास मदत करणारा हा उद्योग आहे. महारेशीम अभियानास शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून रेशीम शेतीचा प्रचार व प्रसिध्दी होवून रेशीम उद्योग लोकाभिमुख होण्यास मदत मिळाली आहे.
त्या अनुषंगाने संचालक (रेशीम) यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सन २०२६ मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी दि. ४ फेब्रुवारी २०२६ पासून ते दि. ११ मार्च २०२६ या कालावधीत महारेशीम अभियान-२०२६ राबविण्यास मान्यता दिली होती. परंतु सदर अभियान कालावधीत मनरेगा योजने अंतर्गत कंत्राटी कर्मचारी दि.२७.०१.२०२६ ते दि.१२.०२.२०२६. पर्यंत संपावर असल्याने तसेच संचालनालयांतर्गत संपुर्ण राज्यभरात अत्यल्प तांत्रीक कर्मचारी आस्थापनेवर होते. Mahareshim Abhiyan 2026
त्यामुळे त्यांना अभियानाव्यतीरीक्त शेतकऱ्यांना तांत्रीक मार्गदर्शन करणे, अंडीपुंज मागणी व पुरवठा करणे, क्षेत्रीय भेटी देणे, कार्यालयीन नियमित कामे करणे मनरेगा अंतर्गत मस्टर संबंधातील सपूर्ण कामकाज वेळेत करणे गरजेचे आहे. ऑनलाईन तुती लागवडीसाठी नाव नोंदणी करणे करीता तांत्रीक अडचणी येत असल्याने महारेशीम अभियान २०२६ राबवितांना लक्षांक पुर्ततेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे. Mahareshim Abhiyan 2026
सबब राज्याचा निर्धारीत लक्षांक साध्य करणे करीता राज्यभरात मोठ्या प्रमाणात नवीन तुती लागवड नाव नोंदणी शिबीरे नियोजीत केलेले असल्याने महारेशीम अभियान २०२६ राबविणेस मुदतवाढ देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. Mahareshim Abhiyan 2026
राज्यातील रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरिता प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी तसेच, सन २०२६ मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी दि.०५.०४.२०२६ मुदतवाढ दिली आहे.
सदर अभियानात समाविष्ट जिल्हे बीड, जालना, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, नागपुर, वर्धा, चंद्रपुर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराधीव व लातूर इ.
अर्ज कुठे करायचा ?
महारेशीम अभियान अंतर्गत नोंदणी करण्यासाठी आपण जिल्हा रेशीम कार्यालय किंवा पंचायत समिति किंवा कृषि विभाग यांच्याकडे ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर
* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?
* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?
