Posted in

MahaVistaar AI App : महाविस्तार ॲपला शेतकर्‍यांची अधिक पसंती | तुम्ही डाऊनलोड केले का?

MahaVistaar AI App
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3/5 - (2 votes)

MahaVistaar AI App : कृषी विभागाच्या महाविस्तार ॲप या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, २२ मार्च २०२६ पर्यंत तब्बल ३७ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. डिजिटल शेतीकडे वाटचाल करणाऱ्या या उपक्रमामुळे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार होताना दिसत आहे.(MahaVistaar AI App) नोंदणीच्या बाबतीत मराठवाड्यातील जिल्ह्यांनी विशेष कामगिरी केली आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीड जिल्हे राज्यातील ‘टॉप टेन’मध्ये स्थान पटकावण्यात यशस्वी ठरले आहेत. 

 

ॲपचे फायदे काय? MahaVistaar AI App

 

>> ‘महाविस्तार’ ॲप हे एआय-आधारित असून शेतकऱ्यांना खालील सुविधा उपलब्ध करून देते 

>> हवामानाचा अचूक अंदाज

>> कीड व रोग नियंत्रणाविषयी मार्गदर्शन

>> बाजारभावाची अद्ययावत माहिती

>> पेरणीपासून विक्रीपर्यंत सर्व शासकीय योजनांचा थेट लाभ या माध्यमातून कृषी विस्तार यंत्रणेला गती मिळून शेतकऱ्यांपर्यंत माहिती जलद पोहोचवण्याचा उद्देश आहे.

 

शेतकरी यांच्या मते, हे ॲप शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरून हवामान, बाजारभाव आणि कीड नियंत्रणाबाबत अचूक माहिती देणार आहे. तर काही शेतकऱ्यांनी तांत्रिक अडचणी दूर करण्याची गरज व्यक्त केली आहे. ‘महाविस्तार’ उपक्रमामुळे राज्यातील शेती अधिक डिजिटल आणि आधुनिक होत असली, तरी तांत्रिक अडचणी दूर करणे अत्यावश्यक आहे. या समस्या सोडवल्यास हा उपक्रम खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरू शकतो. MahaVistaar AI App

 

ॲपची महत्त्वाची वैशिष्ट्ये

 

महाविस्तार ॲपमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक उपयुक्त फीचर्स देण्यात आली आहेत: MahaVistaar AI App

वैशिष्ट्य फायदा
पीक सल्ला पिकावरील कीड व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला.
योजनांची माहिती महाडीबीटी (MahaDBT) आणि इतर योजनांसाठी थेट मार्गदर्शन.
हवामान अंदाज स्थानिक पातळीवरील अचूक हवामान माहितीमुळे शेतीकामांचे नियोजन सोपे.
बाजार भाव विविध बाजार समित्यांमधील शेतीमालाचे दर रोज अपडेट होतात.

 

 

कृषी विभागाचा उद्देश

 

कृषी विभागाचा मुख्य उद्देश ‘डिजिटल कृषी विस्तार’ राबवणे हा आहे. पारंपारिक पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे कठीण असते, मात्र या ॲपमुळे कृषी तंत्रज्ञान अगदी दुर्गम भागातील शेतकऱ्याच्या मोबाईलपर्यंत पोहोचले आहे.

महत्त्वाची नोंद: हे ॲप केवळ माहिती देत नाही, तर शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रवृत्त करत आहे, ज्यामुळे उत्पादकता वाढण्यास मदत होत आहे.

 

 

तुम्ही वापरुन पहीतले का ॲप?

 

जर तुम्ही अजून हे ॲप वापरले नसेल, तर गुगल प्ले स्टोअरवरून ते डाऊनलोड करून नोंदणी करू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या क्षेत्राशी संबंधित विशिष्ट सल्ले मिळणे सुरू होईल. MahaVistaar AI App

 

ॲप डाऊनलोड करा

 

 

हे पण पहा :

* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा

* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना

* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर

* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?

* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?

* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू

* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?

error: Content is protected !!