Solar Pump Precautions : सोलर पंप सिस्टीम दिवसा चालू असताना सूर्यकिरणांपासून सौर पॅनेल (Solar Pump Precautions) विद्युत ऊर्जा निर्मिती करतात, जिचे रूपांतर इन्व्हर्टरद्वारे विजेमध्ये होते. ही वीज घरासाठी किंवा कृषी पंपासाठी वापरली जाते. काही दिवसांपूर्वी सोलर सुरु असताना एका शेतकऱ्याला करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली त्यामुळे आपण कोणती काळजी घ्यावी याबाबत या ठिकाणी पाहुयात. Solar Pump Precautions
सोलर पॅनेल सूर्यप्रकाशात थेट करंट (Solar Pump Precautions) तयार करत असल्याने, ओल्या हाताने किंवा खराब झालेल्या वायरला स्पर्श केल्यास शॉक लागू शकतो. हे टाळण्यासाठी दिवसा साफसफाई करू नका, इन्सुलेशन तपासा, आणि अर्थिंग योग्य असल्याची खात्री करा. सोलर सिस्टीममध्ये दिवसा वीज निर्मिती सुरू असते, त्यामुळे ती नेहमी धोकादायक मानून हाताळावी.
करंट लागण्याची मुख्य कारणे आणि उपाय Solar Pump Precautions
दिवसा साफसफाई केल्याने : सोलर पॅनेल दिवसा (सूर्यप्रकाश असताना) खूप जास्त वीज (Solar Pump Precautions) तयार करतात. त्यामुळे पॅनेल साफ करताना किंवा ओल्या कपड्याने पुसताना करंट लागण्याचा धोका असतो.
उपाय : पॅनेल नेहमी पहाटे किंवा संध्याकाळी, सूर्यप्रकाश नसताना साफ करा. दोषपूर्ण केबल्स (Damaged Wires) : ऊन, वारा आणि पावसामुळे पॅनेलची वायर उघडी पडली असेल, तर करंट लागू शकतो. वायरवर कुठेही कट किंवा घर्षण नाही ना, याची वेळोवेळी तपासणी करा. खराब वायर तत्काळ बदला.
अर्थिंग (Earthing) चा अभाव : जर तुमच्या सोलर सिस्टमला योग्य अर्थिंग नसेल, तर धातूच्या फ्रेममध्ये करंट येऊ शकतो.
उपाय : सोलर प्लेट्सच्या सपोर्टिंग स्ट्रक्चरला (Metal Frame) अर्थिंग जोडलेले असल्याची खात्री करा.
ओली जमीन किंवा हात : ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर उभे राहून सोलरच्या भागांना स्पर्श करणे टाळा.
सुरक्षितता टिप्स
सोलर पॅनेल किंवा वायरला हाताळताना नेहमी रबरी हातमोजे (Insulated Gloves) वापरा. दिवसा उन्हात साफ सफाई टाळा, कुणास सोलर पॅनल ला हात लाऊ देऊ नका, दोन सोलर पॅनेल जोडून जास्त व्होल्टेज तयार होत असल्याने, ते धोकादायक असू शकते. सिस्टमची नियमित देखभाल (Solar Pump Precautions) करा.
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर
* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?
* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?
