Urea Fertilizer Bag : युरियाचा अतिरिक्त वापर रोखणे आणि शेतकऱ्यांना खतांचा विवेकपूर्ण व कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देणे या उद्देशाने गोणीचा आकार 50 किलोवरून 45 किलोपर्यंत आणि काही प्रकरणांमध्ये 40 किलोपर्यंत कमी करण्यात आला आहे. सध्या, 45 किलोच्या ‘नीम कोटेड युरिया’च्या गोणीची कमाल किरकोळ किंमत (एम आर पी) प्रति गोणी 242 रुपये आहे (नीम कोटिंगचे शुल्क आणि लागू कर वगळता) इतकी आहे.
त्याचप्रमाणे, ‘सल्फर कोटेड युरिया’ची एम आर पी 40 किलोच्या गोणीसाठी 254 रुपये आहे (केंद्र आणि राज्याचे उपकर/GST वगळता) इतकी आहे. सरकारने यावर भर दिला आहे की, शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता शाश्वत कृषी पद्धती सुनिश्चित करणे हा या उपाययोजनांचा उद्देश आहे. ही माहिती रसायन आणि खते मंत्रालयाच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. Urea Fertilizer Bag
तर, संतुलित खत वापराला चालना देण्यासाठी आणि जमिनीचा कस सुधारण्यासाठी एक धोरणात्मक उपाय म्हणून युरियाच्या गोणीचा आकार कमी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता शाश्वत कृषी पद्धती सुनिश्चित करणे हा या उपाययोजनांचा उद्देश आहे.
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर
* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?
* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?
