Mahadbt Farmer Lottery list march 2023 महाडीबीटी कृषि यंत्रे लॉटरी यादी
Mahadbt Farmer Lottery list march 2023 महाडीबीटी कृषि यंत्रे लॉटरी यादी 2023
Mahadbt Farmer Lottery list march 2023 :
कृषि विभागाच्या krishivibhag योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण यापूर्वी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्याला एका पेक्षा अधिक घटकासाठी जसे की तुषार संच, ठिबक सिंचन, रोटावेटर, ट्रॅक्टर व इतर यंत्रे, इत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्याला प्रत्येक घटकासाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत कागदपत्रे जसे की सातबारा, होल्डिंग, आधार कार्ड, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे ही त्या कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती.
परंतु, आता कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज ठेवली नाहीये तर आता ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये शेतकरी हे लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करू शकतात, यासाठी कृषि विभाग, महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी फार्मर – शेतकरी योजना हे पोर्टल तयार केले आहे. आणि या पोर्टल द्वारे ज्या शेतकर्यांची विविध योजना अंतर्गत निवड होत असते त्यांना त्यांच्या मोबाइल वरती संदेश देऊन या बाबत अवगत Mahadbt Farmer Lottery list march 2023 देखील केले जाते.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे दिनांक 25 मार्च 2023 रोजी कृषि यांत्रिकीकरण घटकाची सोडत यादी Mahadbt Farmer Lottery list march 2023 केली आहे आणि या यादीमध्ये एकून 80,000 शेतकर्यांची कृषि यंत्र औजारे साठी निवड करण्यात आली आहे. या यादी मध्ये कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलित औजारे रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, नांगर, खोडवा कटर, इत्यादि अनेक कृषि यंत्रे साठी शेतकर्यांची निवड करण्यात आली आहे.
ज्या शेतकर्यांची शेतकरी योजना पोर्टल द्वारे लाभार्थ्यांची निवड Mahadbt Farmer Lottery list march 2023 झाली आहे त्या लाभार्थ्यांनि निवड झाल्यापासून ०७ दिवसांमध्ये महाडीबीटी फार्मर पोर्टल वर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल. तसेच, दिलेला कालावधी झाल्यानंतर परत ज्या शेतकर्यांचे कागदपत्रे अपलोड करावयाचे राहिले असतील त्यांना त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती संदेश पाठवून परत ०३ दिवसांची वाढीव मुदत देण्यात येईल आणि या देण्यात आलेल्या मुदतीमध्ये जे शेतकरी कागदपत्रे ही अपलोड करण्यास असमर्थ ठरतील त्यांचे अर्ज सिस्टीम द्वारे आपोआप रद्द केले जातील याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.
कृषि यांत्रिकीरकण सोडत यादी : मार्च 2023
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल महाडीबीटी कृषि यांत्रिकीरकण सोडत यादी Mahadbt Farmer Lottery list march 2023 पहाण्यासाठी किंवा मोबाइल मध्ये यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या