Posted in

MahaDBT Documents : कृषि यांत्रिकीकरण साठी निवड झाल्यानंतर आता “ही” कागदपत्रे अपलोड करा

Mahadbt documents
4.1/5 - (19 votes)

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (MahaDBT Documents) द्वारे कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात आणि या ऑनलाइन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत काढली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे निवड झाल्यानंतर शेतकर्‍यांना काही आवश्यक कागदपत्रे ही पोर्टल वर अपलोड करणे आवश्यक आहे तर त्या नंतर च त्या शेतकर्‍यांना कागदपत्रांची छाननी करून निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी पूर्व संमती दिली जाते. तर, ही कागदपत्रे कोणती अपलोड करायची ती खालील प्रमाणे आहेत. MahaDBT Documents

 

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर आता काही बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता या पुढे शेतकर्‍यांना सात बारा उतारा, आठ अ- होल्डिंग उतारा, आधार आणि बँक पासबूक या कागदपत्रांची आवश्यकता असणार नाहीये. तर मग कोणती कागदपत्रे अपलोड करावी ते खालील प्रमाणे : (MahaDBT Documents)

 

1. निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन

2. निवड झालेल्या यंत्राचा वैध टेस्ट रीपोर्ट

3. शॉप चे डीलरशिप सर्टिफिकेट

4. अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र  (येथून डाऊनलोड करा )

5. वैध जात प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर)

6. ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक

7. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र (येथून डाऊनलोड करा )

8. शेतकर्‍याने द्यावयाचे हमीपत्र (येथून डाऊनलोड करा )

 

 

error: Content is protected !!