Mechanization List : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (Mechanization Lottery List) द्वारे कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. आणि या ऑनलाइन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत काढली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे राज्य कृषी यांत्रिकीकरण अभियान कृषी यांत्रिकीकरण उप अभियान एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना या चार योजना अंतर्गत कृषी यंत्र व अवजारे यांची सोडत यादी ही दिनांक 8 ऑगस्ट रोजी करण्यात आलेली आहे. या सोडत यादीमध्ये राज्यातील एकूण दीड लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे चालू वर्षातील ही सर्वात मोठी सोडत यादी आहे. या सोडत यादीमध्ये शेतकरी बांधवांची ट्रॅक्टर चलीत अवजारे रोटावेटर कल्टीवेटर पेरणी यंत्र इत्यादी विविध शेती अवजारांसाठी निवड करण्यात आलेली आहे
तर, दिनांक 08 ऑगस्ट 2025 रोजी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण घटकाची सोडत यादी काढण्यात आलेली आहे. तर या यादीमध्ये ज्या शेतकर्यांची निवड झाली आहे त्यांनी आवश्यक कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करून घ्यावे. Mechanization List
महाडीबीटी सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक अपलोड करावे लागते आणि त्यानंतर पूर्वसंमती आणि पुढे अनुदान रक्कम अदा करणे असे टप्पे महाडीबीटी मध्ये आहेत. (Mechanization List)
दिनांक 08 ऑगस्ट 2025 रोजी कृषि यांत्रिकीकरणाची सोडत काढण्यात आली आहे. या सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक अपलोड करावे.(MahaDBT Farmer List)
ट्रॅक्टर चलित औजारांसाठी निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे आणि जर ट्रॅक्टर हे निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने नसेल तर कुटुंबातील सदस्यांच्या नावाने असणे आवश्यक आहे. (येथे कुटुंब म्हणजे आई, वडील आणि त्यांचे अविवाहित अपत्य) MahaDBT Farmer List
दिनांक 08 ऑगस्ट च्या सोडत मध्ये जिल्हा निहाय खालील प्रमाणे शेतकर्यांची निवड झालेली आहे.
जिल्हा | निवड शेतकरी संख्या |
अकोला | 4761 |
अमरावती | 5017 |
अहिल्यानगर | 10115 |
कोल्हापूर | 5138 |
गडचिरोली | 1041 |
गोंदिया | 1753 |
चंद्रपूर | 3344 |
छत्रपती संभाजीनगर | 6913 |
जळगाव | 7998 |
जालना | 5212 |
ठाणे | 275 |
धाराशिव | 6457 |
धुळे | 3775 |
नंदुरबार | 2458 |
नांदेड | 7455 |
नागपूर | 3694 |
नाशिक | 6595 |
परभणी | 7658 |
पालघर | 323 |
पुणे | 5988 |
बीड | 8391 |
बुलढाणा | 7874 |
भंडारा | 1134 |
यवतमाळ | 8040 |
रत्नागिरी | 1052 |
रायगड | 317 |
लातूर | 6880 |
वर्धा | 4820 |
वाशिम | 3391 |
सांगली | 6159 |
सातारा | 5248 |
सिंधुदुर्ग | 1650 |
सोलापूर | 8211 |
हिंगोली | 4085 |
Grand Total Mechanization List | 163222 |
आपल्या जिल्ह्याची सोडत यादी पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या.
जिल्हा निहाय सोडत यादी : येथे डाऊनलोड करा