NDKSP Pocra Scheme : जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या प्रकल्पात राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली तर विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खानदेशातील जळगाव व नाशिक अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित 6000 कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यात येणार आहे. NDKSP Pocra Scheme
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा – २ अंतर्गत पोकरा योजनेंतर्गत विविध घटकांसाठी अर्थसहाय्य लाभासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यात खालील नमूद योजना साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
वैयक्तिक लाभाचे घटक (NDKSP Pocra Scheme)
वृक्ष लागवड
फळबाग लागवड
बांबु लागवड
तुषार सिंचन संच
ठिबक सिंचन संच
शेततळे
शेततळे अस्तरीकरण
शेळीपालन
परसातील कुक्कुटपालन
रेशीम शेती (तुती लागवड)
नाडेप, कंपोस्ट, गांडुळखत युनिट
गोड्या पाण्यातील मत्सव्यवसाय
विहीर पुनर्भरण
हरितगृह/शेडनेट बोडी दुरुस्ती/नपीन बोडी पाईप,
पंपसंच (फक्त SC, ST खातेदारांसाठी)
बिजोत्पादन
बचत गट, फार्मर प्रोडुसर कंपनी यांच्यासाठी
कृषी औजारे बँक (फक्त महिला बचत गटासाठी)
गोदाम व वेअर हाऊस
अन्न प्रक्रिया युनिट धान्य प्रक्रिया युनिट
मिनी दाल मिल मसाले युनिट
एकात्मिक पॅक हाऊस
दुध प्रक्रिया युनिट
बियाणे प्रक्रिया शेड / सुकवणी यार्ड
ऑनलाइन अर्ज
पोकरा योजनेंतर्गत विविध घटकांसाठी अर्थसहाय्य लाभासाठी अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. हे पोर्टल https://dbt-ndksp.mahapocra.gov.in/ वर उपलब्ध असून, येथे अर्ज सादर करण्याची सोपी प्रक्रिया आहे किंवा Mahavistar. Ai App द्वारे DBT मधून भेट अर्ज करू शकता. NDKSP Pocra Scheme
