Posted in

Rabi Jwari Minikit : रब्बी ज्वारी मिनिकीट मिळणार मोफत | असा करा महाडीबीटी वर अर्ज?

Rabbi jwari minikit mahadbt farmer
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
2.5/5 - (6 votes)

Rabi Jwari Minikit : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर हरभरा, गहू प्रमाणित व बियाणे संच साठी ऑनलाइन अर्ज सुरू आहेत तर आता यामध्ये पौष्टिक तृणधान्य मध्ये ज्वारी बियाणे संच साठी ऑनलाइन अर्ज सुरू केलेले आहेत. हे ज्वारी बियाणे शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहे. 

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उपअभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य अंतर्गत रब्बी ज्वारी मिनीकिट योजना २०२६-२७ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या वर्षात रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधवांना मोफत ज्वारी मिनीकिटचा लाभ देण्यात येणार आहे. Rabi Jwari Minikit

 

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :

 

✅ वैयक्तिक शेतकरी लाभार्थ्यांना एक मिनीकिट (४ किलो) प्रति एकर क्षेत्रासाठी.

✅ एकूण २४,२५०० बियाणे मिनीकिटचे विनामूल्य वितरण करण्यात येणार आहे.

✅ सुधारित वाणांमध्ये फुले यशोमती, परभणी शक्ती आणि परभणी सुपर मोती यांचा समावेश आहे.

 

 

या उपक्रमाचे फायदे :

✔️ उच्च उत्पन्न देणाऱ्या सुधारित वाणांचा वापर
✔️ धान्य व चाऱ्यासाठी उपयुक्त ज्वारी उत्पादन
✔️ बियाण्यांवरील खर्चात बचत
✔️ पोषण सुरक्षा आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन

 

💻 ऑनलाइन अर्जासाठी :

🌐 https://mahadbt.maharashtra.gov.in

 

📌 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :
▪️ तालुका कृषी अधिकारी
▪️ मंडळ कृषी अधिकारी
▪️ उप कृषी अधिकारी
▪️ सहाय्यक कृषी अधिकारी

 

📢 शेतकरी बांधवांना आवाहन!

पात्र शेतकरी बांधवांनी MahaDBT पोर्टलवर योजनेची उपलब्धता, पात्रता व आवश्यक कागदपत्रांची माहिती तपासून ऑनलाइन अर्ज करावा आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा.

 

error: Content is protected !!