Gas e-KYC Deadline : गॅस कंपन्यांच्या माहितीनुसार, ई-केवायसी मोहिमेचा उद्देश प्रत्येक गॅस कनेक्शनची पडताळणी करणे, बनावट किंवा अनधिकृत कनेक्शन रोखणे आणि सरकारी अनुदान योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. त्यामुळे सर्व वितरकांना १५ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त ग्राहकांची ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, ग्राहकांना फोन, एसएमएसद्वारे ekyc बाबत सूचना दिल्या जात आहेत. (Gas e-KYC Deadline)
गॅस कंपन्यांनी देशभरातील घरगुती LPG गॅस सर्व ग्राहकांना १५ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. वेळेत ई-केवायसी न केल्यास घरगुती गॅस सिलेंडरऐवजी व्यावसायिक (Commercial) दराने सिलेंडर घ्यावा लागू शकतो किंवा रिफिल बुकिंगमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. (Gas e-KYC Deadline)
सध्या अनेक भागांत मोठ्या संख्येने ग्राहकांनी ई-केवायसी केलेली नसल्यामुळे गॅस एजन्सीकडून फोन, एसएमएस आणि प्रत्यक्ष संपर्क करून ग्राहकांना प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. काही ग्राहकांना रिफिल बुकिंग ब्लॉक होण्याबाबतचे संदेशही मिळू लागल्याची माहिती समोर आली आहे. (Gas e-KYC Deadline)
e-KYC कुठे आणि कशी करायची?
ग्राहक आपल्या जवळच्या गॅस एजन्सीला भेट देऊन किंवा संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन अॅप्लिकेशन सुविधेद्वारे ई-केवायसी पूर्ण करू शकतात. यासाठी आधार कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आवश्यक ओळखपत्रांची पडताळणी केली जाते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गॅस कनेक्शनची माहिती अद्ययावत केली जाते. गॅस कंपन्या आणि वितरकांनी सर्व ग्राहकांना १५ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करून भविष्यातील अडचणी टाळण्याचे आवाहन केले आहे.








