Posted in

CHC Subsidy for womens : महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना

Chc subsidy for womens group
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

CHC Subsidy for womens : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्यांतर्गत महिला बचत गटांना कृषी व्यवसायात प्रगती साधण्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  पोकरा प्रकल्प च्या या योजनेअंतर्गत गावपातळीवर ‘कृषी अवजार बँक’ स्थापन करण्यासाठी एकूण प्रकल्प मूल्याच्या 60 टक्क्यांपर्यंत आणि कमाल 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

 

पोकरा प्रकल्प च्या या योजनेअंतर्गत प्रकल्प असलेल्या गावांमधील ‘उमेद’, माविम पुरस्कृत तसेच इतर महिला बचत गट आणि महिलांचे गाव संघ पात्र राहणार आहेत. लाभ घेण्यासाठी संबंधित गटात वेगवेगळ्या कुटुंबांतील किमान १० सदस्य असणे आवश्यक आहे. तसेच ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी अवजार बँकेचा लाभ घेतला आहे, त्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. CHC Subsidy for womens

 

कृषी अवजार बँक साठी प्रत्येक गावातून केवळ एका गटालाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थीची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. प्रकल्पाचे मूल्य 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास राष्ट्रीयीकृत बँकेकडून 75 टक्के कर्ज घेणे बंधनकारक राहील. CHC Subsidy for womens

 

 

ऑनलाइन अर्ज CHC Subsidy for womens

 

निवड झालेल्या महिला गटांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशिन, कंबाईन हार्वेस्टर तसेच फवारणी पंप यांसारखी आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी करता येणार आहे. इच्छुक महिला बचत गटांनी प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टल साइट वर https://dbt-ndksp.mahapocra.gov.in/ ५ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावेत.

 

अर्ज सादर करण्यासाठी पोकरा योजनेचे पोर्टल : येथे भेट द्या

 

 

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा – २ अंतर्गत पोकरा योजनेंतर्गत विविध घटकांसाठी अर्थसहाय्य लाभासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

 

वैयक्तिक लाभाचे घटक

वृक्ष लागवड

फळबाग लागवड

बांबु लागवड

तुषार सिंचन संच

ठिबक सिंचन संच

शेततळे

शेततळे अस्तरीकरण

शेळीपालन

परसातील कुक्कुटपालन

रेशीम शेती (तुती लागवड)

नाडेप, कंपोस्ट, गांडुळखत युनिट

गोड्या पाण्यातील मत्सव्यवसाय

विहीर पुनर्भरण

हरितगृह/शेडनेट बोडी दुरुस्ती/नपीन बोडी पाईप,

पंपसंच (फक्त SC, ST खातेदारांसाठी)

बिजोत्पादन

 

बचत गट, फार्मर प्रोडुसर कंपनी यांच्यासाठी

कृषी औजारे बँक (फक्त महिला बचत गटासाठी)

गोदाम व वेअर हाऊस

अन्न प्रक्रिया युनिट धान्य प्रक्रिया युनिट

मिनी दाल मिल मसाले युनिट

एकात्मिक पॅक हाऊस

दुध प्रक्रिया युनिट

बियाणे प्रक्रिया शेड / सुकवणी यार्ड

 

 

हे पण पहा :

 

* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर

* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?

* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?

* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू

* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?

error: Content is protected !!