Posted in

E Peek Pahani : ई-पीक पाहणीसाठी दिलेली अंतिम मुदत जवळ …. तुम्ही नोंदणी केली का?

Agri Mechanisation
Agri Mechanisation
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
2.7/5 - (3 votes)

E Peek Pahani : रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीसाठी दिलेली अंतिम मुदत ही जवळ येत असून अजूनही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी केलेली नाही. ७/१२ उताऱ्यावर पीक नोंद न झाल्यास पीकविमा, नुकसानभरपाई तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. (E Peek Pahani)

 

E peek pahani ई पीक पाहणीसाठी दिलेली अंतिम मुदत जवळ

 

शासनाच्या रब्बी हंगामासाठीच्या महत्त्वाकांक्षी ई-पीक पाहणी (डिजिटल क्रॉप सर्व्हे) उपक्रमाची अंमलबजावणी राज्यात सुरू झालेली आहे, परंतु राज्यात प्रत्यक्ष नोंदणीचा वेग अपेक्षेइतका नसल्याचे चित्र आहे. (E Peek Pahani)

 

दिनांक १० डिसेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी स्वतःच्या ७/१२ उताऱ्यावर पिकांची नोंद अँड्रॉइड मोबाईलद्वारे करणे बंधनकारक आहे. मात्र, २४ जानेवारी 2026 ही रब्बी पिकांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत जवळ येऊनही मोठ्या प्रमाणावर क्षेत्र अजून नोंदणीबाहेर असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. (E Peek Pahani)

 

डीसीएस ॲपद्वारेच नोंदणी आवश्यक ई-पीक पाहणीसाठी DCS Version 4.0.5 हे ॲप अँड्रॉइड मोबाईलवर इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. गुगल क्रोम अद्ययावत करून शेत बांधावर प्रत्यक्ष जाऊन पीक नोंदणी करून माहिती अपलोड करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोनचा अभाव, इंटरनेट समस्या किंवा ॲप हाताळण्यातील अडचणी दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत तलाठी, कोतवाल, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), तसेच गावनिहाय नियुक्त सहाय्यकांची मदत घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 

ई-पीक पाहणी का महत्त्वाची? E Peek Pahani

 

७/१२ उताऱ्यावर अधिकृत पीक नोंद सुनिश्चित होते

पीकविमा व नुकसानभरपाईसाठी आधार मिळतो

कृषी योजनांचा लाभ सुलभ होतो

नैसर्गिक आपत्तीवेळी मदतीची प्रक्रिया जलद होते

 

ई-पीक पाहणी न केल्यास होणार मोठे नुकसान?

 

ई-पीक पाहणी ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून, ती शेतकऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेशी थेट जोडलेली आहे. जर ७/१२ उताऱ्यावर पीक नोंद झाली नाही, तर संबंधित पीकपेरा कोरा राहतो आणि तो नंतर भरता येत नाही.

 

परिणामी, पीकविमा, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई, विविध शासकीय अनुदाने व योजना यांचा लाभ मिळण्यात मोठे अडथळे येऊ शकतात. अवकाळी पाऊस, गारपीट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अचूक पीक नोंद हीच शेतकऱ्यांची सर्वात मोठी ढाल ठरते.

 

E peek pahani ई पीक पाहणीसाठी दिलेली अंतिम मुदत जवळ

error: Content is protected !!