e-peek pahani : ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?
E-Peek Pahani : शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करण्याकरिता राज्यात ई-पीक पाहणी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमा मधून राज्यातील शेतकरी हे आपल्या शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करू शकणार आहेत.
राज्यामध्ये रब्बी हंगाम 2024-25 साठी ई-पीक पाहणी उपक्रम हा दिनांक 1 डिसेंबर ते 15 जानेवारी 2025 या कालावधी मध्ये राबविण्यात आला आहे. परंतु, या कालावधी मध्ये बरेच शेतकरी हे दिनांक 15 जानेवारी पूर्वी आपल्या पिकांची सातबारा वरती नोंद करू शकले नाहीयेत. यासाठी आता त्यांना एक शेवटचा पर्याय उपलब्ध आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
ई पीक पाहणी का करावी? (E-Peek Pahani)
ई पीक पाहणीची नोंद न केल्यास शेत हे त्यावर्षी पडीक किंवा पेरणी झालीच नाही, असे गृहीत धरण्यात येईल. पुढील हंगामाकरिता कोणत्याही बँकेकडून पीककर्ज घेताना अडचणी निर्माण होतील. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही. यावर्षी ज्या प्रमाणे सोयाबीन कापूस अनुदान देण्यात येत आहे त्याप्रमाणे जर शासनाद्वारे एखाद्या पिकाला आर्थिक मदत जाहीर केली, तर त्यापासूनही वंचित राहावे लागेल. शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केल्यास त्याचीही नुकसान भरपाई मिळू शकणार नाही.
तसेच, ई-पीक पाहणी ही शासनाचे अतिवृष्टी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज, विविध योजना साठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे.
ई-पीक पाहणी करणे राहून गेले…आता हा पर्याय?
तर जे शेतकरी पीक पाहणी नोंद करण्याचे राहिले आहेत त्यांनी आता आपली पीक पाहणी ही आपल्या गावातील सहाय्यक यांच्याकडून करून घ्यावी. आणि ही पीक पाहणी आता 28 जानेवारी पर्यन्त करता येणार आहे. त्यामुळे सर्व राहिलेल्या शेतकर्यांनी आपली पीक पाहणी ही सहाय्यक यांच्या स्तरावरून करून घ्यावी.
ई पीक पाहणी सहाय्यक कोण आहेत?
प्रत्येक गावा मध्ये तहसील कार्यालया मार्फत पीक पाहणी कार्यक्रम करिता सहाय्यक नेमण्यात आलेले आहेत आणि त्या सहाय्यक यांना लॉगिन आयडी देण्यात आलेले आहेत. तर या नेमण्यात आलेल्या सहाय्यक यांच्या स्तरावरून आपण आपली ई पीक पाहणी करून घेऊ शकता. पीक पाहणी सहाय्यक कोण आहेत हे जाणून घेण्या करिता आपण आपल्या गावातील तलाठी किंवा तालुका तहसील कार्यालय येथे संपर्क करावा. (E-Peek Pahani)
* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?
* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …
* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती
* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती
* पोक्रा प्रकल्प टप्पा-2 अमलबजावणी सुरू….
* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान
Tags : e_peek pahani, peek pahani, e-peek pahani dcs, pik pahani, e pik pahani,