Posted in

Farmers Foreign Study Tour : राज्यातील शेतकर्‍यांना परदेशात जाण्याची संधि | कृषि विभागा मार्फत अभ्यास दौरा … लवकर अर्ज करा

Farmers foreign study tour राज्यातील शेतकर् यांना परदेशात जाण्याची संधि कृषि विभागा मार्फत अभ्यास दौरा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4.5/5 - (4 votes)

Farmers Foreign Study Tour : राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादीत होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरुप योग्यवेळी पोहोचविणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयीसुविधा पुरविणे निकडीचे आहे. कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी कृषी विभागाकडून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

 

विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच कृषी संबंधी संस्थांना भेटी इ. द्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यासदौरे आयोजित करणे, हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार सन २०२५-२६ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत खालीलप्रमाणे देशांची व प्रवासी कंपनीची निवड करण्यात आली आहे. Farmers Foreign Study Tour

 

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौर्‍या साठी युरोप – नेदरलँड्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्राईल, जपान , मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाइन्स, दक्षिण कोरिया या देशांची निवड करण्यात आलेली आहे. Farmers Foreign Study Tour

 

राज्यातील विविध पिकांची उत्पादकता, पीक पध्दतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी उत्पादनांचे बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, कृषी प्रक्रियेमधील अद्ययावत पध्दती, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती पद्धती यांमध्ये अमुलाग्र बदल आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील योग्य त्या प्रगतीशील शेतकऱ्यांची विविध स्तरावरील समित्यांमार्फत अंतिम निवड करुन परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान पाहण्याची संधी त्यांना उपलब्ध करण्यासाठी सदर मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही योजना अधिक परिणामकारकपणे राबविण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. 

 

शेतकरी निवडीचे निकष (Farmers Foreign Study Tour)

 

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतूद रु. २०० लक्ष निधीच्या अधीन राहून १८० शेतकरी निवड करताना १० शेतकरी हे राज्यस्तरीय समितीमार्फत शिफारशीकरिता राखीव असतील व उर्वरित १७० शेतकऱ्यांची जिल्हास्तरावरून निवड करताना प्रति जिल्हा किमान ०१ महिला शेतकऱ्याची व किमान ०१ राज्य तथा केंद्रीय शासन स्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त व पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्याची निवड करणे आवश्यक असेल. Farmers Foreign Study Tour

 

परदेश अभ्यासदौऱ्याकरिता शेतकरी निवड करणेसाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे :

१. अभ्यास दौऱ्याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा.

२. स्वतःच्या नावे चालू कालावधीचा (मागील सहा महिन्यातील) ७/१२ व ८-अ उतारा असणे आवश्यक आहे.

३. शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र-२)

४. शेतकऱ्याचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी असणे आवश्यक आहे.

५. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यावयाचे असेल तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी. (कुटुंब या व्याख्येमध्ये पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील मुले/मुली) Farmers Foreign Study Tour

६. शेतकऱ्याने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.

७. शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी २५ वर्षे पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही परंतु शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे. यासाठी सदर योजनेत सहभागी होण्यास अर्ज सादर करताना शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे) सादर करावे.

८. शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून मिळाल्यानंतर देखील शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एम.बी.बी.एस. डॉक्टरचे) सादर करावे. कोरोनाविषयक तपासणी करुन तसा अहवाल कृषी आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग ७-१० दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारिरीकदृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे बंधनकारक राहील. Farmers Foreign Study Tour

९. शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. पुराव्यासाठी पारपत्राची मुदत/वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी. पारपत्राची वैध मुदत दौरा निघताना किमान तीन महिनेपेक्षा जास्त असावी.

१०. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए (चार्टड अकाउंटंट), अभियंता, कंत्राटदार इ. नसावा. तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र-२)

११. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय (केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषी विद्यापिठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र-२)

१२. शेतकरी निवडबाबत अंतिम अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राखीव असतील. Farmers Foreign Study Tour

 

 

अनुदानाचा तपशील 

 

१. शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरिता सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रु. १.०० लाख (रुपये एक लाख फक्त) यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. Farmers Foreign Study Tour

२. योजनेचा लाभ घेण्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना दौऱ्यांची तारीख निश्चित झाल्यानंतर दौऱ्यामध्ये निवड झाल्याचे कृषी विभागाकडून पत्र मिळाल्यानंतरच अभ्यास दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा रु. १.०० लाख यापैकी जी रक्कम कमी असेल ती वगळून उर्वरित रक्कम प्रवासी कंपनीकडे आगाऊ भरणा करणे बंधनकारक राहील. सदरची रक्कम शेतकऱ्याने कॅशलेस पध्दतीने त्यांच्या आधार क्रमांकाशी निगडीत स्वतःच्या बँक खात्यातून एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, धनाकर्ष किंवा धनादेशाद्वारे प्रवासी कंपनीस अदा करणे व त्याचा पुरावा कृषी आयुक्तालय कार्यालयास सादर करणे आवश्यक राहील. Farmers Foreign Study Tour

 

परदेश दौरा अर्ज

 

परदेश दौरा साठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने आपण आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जमा करावयाचा आहे. त्यानंतर आपला अर्ज छाननी करून आपण पात्र असाल तर आपली निवड करण्यात येईल.

 

 

परदेश दौरा अर्ज नमूना

 

परदेश दौरा साठी अर्ज : डाऊनलोड करा

 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!