Posted in

बोगस पीक विमा काढाल तर आधार क्रमांक जाणार काळ्या यादीत | Fraud Crop Insurance Applications

बोगस पीक विमा काढाल तर आधार क्रमांक जाणार काळ्या यादीत fraud crop insurance applications
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.2/5 - (5 votes)

Fraud Crop Insurance Applications : राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना Cup & Cap Model (८०:११०) नुसार खरीप २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ या १ वर्षाकरिता, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी, विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून १ वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे.

 

सदरची योजना ही एकूण १२ जिल्हा समुहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत सन २०२५-२६ या एक वर्षाकरिता ८०:११० कप व कॅप मॉडेलनुसार राबविण्यात येईल. त्यामध्ये नुकसान भरपाईचे दायित्व संबंधीत विमा कंपनीवर राहणार आहे. विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रक्कमेच्या ११० टक्के किंवा एकूण विमा संरक्षित रकमेवर बर्न कॉस्ट (Burn Cost) नुसार येणाऱ्या विमा हप्त्याच्या ११० टक्के यापैकी जे जास्त असेल, त्यापर्यंतचे दायित्व स्विकारतील व यापुढील दायित्व राज्य शासन स्विकारेल आणि जर देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी जमा विमा हप्ता रक्कमेच्या जास्तीत जास्त २० टक्के रक्कम स्वत:कडे ठेवेल व उर्वरीत विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला विहित वेळेत परत करेल. Fraud Crop Insurance Applications

 

या योजनेत एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्षे काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. Fraud Crop Insurance Applications

 

तसेच, या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे, तसेच, इतर अवैध मार्गानी विमा काढला गेल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल. या योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (AGRISTACK Farmer ID) असणे अनिवार्य असेल. पीक विमा नुकसान भरपाईसाठी, ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील.

 

 

बोगस कराल तर कारवाई होणार? (Fraud Crop Insurance Applications)

 

काही सीएससी चालक हे खोटी कागदपत्रे तयार करून पीक विमा भरत असून, यात कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससीच्या मालकांचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

 

बोगस पीक विमा काढणाऱ्या संबंधित शेतकऱ्याला पाच वर्षांपर्यंत कुठल्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तसेच बोगस अर्ज भराल तर आधार नंबर काळ्या यादीत समाविष्ट केले जाणार आहे आणि संबंधित सीएससी चालकावर गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.

error: Content is protected !!