Gram PSS Rabi 2026 : हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने हरभरा खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यांच्या माध्यमातून खरेदी केंद्रांवर प्रति क्विंटल ५,८७५ रुपये या हमीभावाने हरभरा खरेदी केली जात आहे.
हमीभावामुळे शेतकऱ्यांना आधार यंदा नवीन हरभऱ्यासाठी शासनाने 5875 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव निश्चित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात नवीन हरभऱ्याची आवक वाढू लागली होती. मात्र, खुल्या बाजारात शेतकऱ्यांना 5200 ते 5700 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता. हा दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत होते. शेतकऱ्यांची मागणी नुसार कमी बाजारभावामुळे हरभरा हमीदराने खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करत होते. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेत 1 मार्चपासून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली. (Gram PSS Rabi 2026)
यंदाच्या हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्पादनही चांगले होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा आणि बाजारातील दरांतील चढ-उताराचा फटका बसू नये, या उद्देशाने शासनाने खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. हमीभावाने हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली आहे. (Gram PSS Rabi 2026)
हरभरा खरेदीसाठी प्रमुख अटी काय? Gram PSS Rabi 2026
>>ऑनलाइन नोंदणी आवश्यक
>>ई-पीक पाहणी नोंद असणे आवश्यक
>>७/१२ व ८-अ उतारा आवश्यक
>>आधार व बँक खाते लिंक असणे
>>नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडूनच खरेदी
>>दर्जा (FAQ) निकष पूर्ण असावे
दर्जा (FAQ) निकष काय आहेत?
>>आर्द्रता मर्यादित असावी
>>खराब किंवा तुटलेले दाणे कमी असावेत
>>कीडग्रस्त माल स्वीकारला जात नाही
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
