MahaDBT Irrigation Documents : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर तुषार/ठिबक करिता निवड झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला पुढील 10 दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रे आपलोड करणे बंधनकारक असते अन्यथा तो अर्ज रद्द करण्यात येतो. त्यामुळे निवड झाल्यानंतर कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत ती आपण खालील प्रमाणे पाहू शकता.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे विविध घटका साठी लाभार्थ्यांची निवड केली जाते यामध्ये तुषार आणि ठिबक सिंचन साठी देखील शेतकर्यांची निवड केली जाते. तर, पोर्टल वर निवड झाल्यानंतर त्या घटकासाठी पूर्व संमती मिळण्या करिता संबंधित लाभार्थ्याला काही आवश्यक कागदपत्रे ही पोर्टल वर अपलोड करणे बंधनकारक आहे. ही आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतरच अर्ज छाननी साठी जातो आणि त्यानंतर घटक खरेदी करण्या साठी संमती दिली जाते. (MahaDBT Irrigation Documents) महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर आता काही बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता या पुढे शेतकर्यांना सात बारा उतारा, आठ अ- होल्डिंग उतारा, आधार आणि बँक पासबूक या कागदपत्रांची आवश्यकता असणार नाहीये.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (MahaDBT Sprinkler Drip) वर प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार सिंचन संच किंवा ठिबक संच साठि निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे: MahaDBT Irrigation Documents
1. सात बारा वर सिंचन स्त्रोत नोंद नसेल तर ओलीताचे स्वयंघोषणा पत्र (येथून डाऊनलोड करा )
2. हमीपत्र (येथून डाऊनलोड करा )
3. सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र (येथून डाऊनलोड करा )
4. अर्जदार अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र (येथून डाऊनलोड करा )
5. वैध जात प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर)
वरील प्रमाणे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपला अर्ज हा त्रुटि मध्ये येणारच नाही त्यामुळे निवड झाल्यानंतर वरील आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. MahaDBT Irrigation Documents