MahaDBT Farmer : कृषी विभागाने दीड महिनाभरापासून महाडीबीटी पोर्टलवरील ‘पूर्वसंमती’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक लॉक करून ठेवल्याने राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे प्रस्ताव अडकून पडले आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे वारंवार आवाहन केले जाते परंतु त्यानुसार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने अर्जही केले मात्र आता पुढील टप्प्यावरच प्रक्रिया ठप्प झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत आणि पूर्व संमती ची वाट पाहत आहेत.
सध्या अर्ज सादर झालेले आहेत, कागदपत्रांची पूर्तता झाली आहे. तपासणीही पूर्ण झाली आहे; मात्र पूर्वसंमती न मिळाल्याने पुढील कोणतीही कार्यवाही होऊ शकत नाही. ऑनलाइन पद्धतीने पूर्वसंमतीचा टॅब बंद आहे. संबंधित खिडकीच तात्पुरती बंद ठेवण्यात आल्याने संपूर्ण यंत्रणा ठप्प झाल्यासारखी आहे. कृषी अधिकारीही हतबल असून, त्यांच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर देता येत नसल्याचे चित्र आहे. MahaDBT Farmer
परंतु, या मुळे बरेच शेतकरी हे निवड होऊन देखील पूर्व संमती अभावी यंत्राची खरेदी करू शकत नाहीयेत. त्यामुळे, लवकर पूर्व संमती देणे सुरू करावे असे शेतकरी वर्गातून मागणी करण्यात येत आहे.
काय आहे कारण? MahaDBT Farmer
मिळालेल्या माहिती नुसार निधि अभावी पूर्व संमती देणे बंद केले असल्याचे कळत आहे. अतिरिक्त दायित्व निर्माण होऊ नये म्हणून सध्या पूर्व संमती देणे बंद केले आहे.
शेतकर्यांनी काय करावे?
शेतकरी बांधवांनी आपल्याला पूर्व संमती आल्याशिवाय यंत्र खरेदी करू नये कारण पुढे अनुदान अदा करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संमती शिवाय ट्रॅक्टर/यंत्र खरेदी करू नयेत.
