Posted in

Mechanization Subsidy Fund : कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्‍यांना अनुदान मिळणार

Mechanization subsidy fund
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Mechanization Subsidy Fund : कृषि विभागा मार्फत राज्यातील शेतकर्‍यांना कृषि यंत्र अनुदान, सिंचन साधने अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज मागविले जातात. त्यानंतर, केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधि नुसार महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण/इतर घटकाची सोडत काढल्या जाते आणि सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांनी घटक खरेदी केल्यानंतर त्यांना अनुदान वितरण केले जाते.

 

तर, या योजनेसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी रु.४००.०० कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत सन २०२५-२६ मध्ये रु.४००.०० कोटीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सदर योजनेकरिता यापूर्वी आर्थिक वर्ष २०२५-२६करिता आतापर्यंत एकूण रू.२५०.०० कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. Mechanization Subsidy Fund

 

कृषि संचालक, कृषि अभियांत्रिकी, संचालनालय यांनी सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पिय तरतूदीपैकी उर्वरित रू.१५०.०० कोटी इतका निधी कृषि आयुक्तालयास उपलब्ध करून देण्याची शासनास विनंती करण्यात आली होती. त्यानुषंगाने वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार रु.१५०.०० कोटी इतका निधी वितरीत करण्यास आज 24 मार्च 2026 च्या शासन निर्णया नुसार मंजूरी देण्यात आली आहे.

 

 

कोणत्या शेतकर्‍यांना मिळणार हे अनुदान? Mechanization Subsidy Fund

 

ज्या शेतकर्‍यांचे राज्य कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत कृषि यंत्र व औजारे खरेदी होऊन कृषि अधिकारी यांची तपासणी पूर्ण झाली आहे असे सर्व शेतकरी हे या अनुदानास पात्र आहेत. तरी, हे अनुदान पुढील 7 दिवसांत पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. Mechanization Subsidy Fund

 

 

शासन निर्णय : येथे पहा

 

 

हे पण पहा :

 

* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान

* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा

* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना

* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर

* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?

* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?

* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू

* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?

error: Content is protected !!