Posted in

MahaDBT Drone Applications : फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान

MahaDBT Drone Applications process
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4.3/5 - (6 votes)

राज्यातील शेतकर्‍यांना पिकांच्या फवारणी (MahaDBT Drone Applications) करिता येणारी प्रमुख अडचण म्हणजे मजूर उपलब्ध असणे. तर, शेतामधील मजूर टंचाई वरती मात करण्यासाठी कृषि मध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. तर, यामध्येच आता पिकांची फवारणी करण्यासाठी ड्रोन चा वापर करण्यात येत आहे. यामुळे, शेतकर्‍यांच्या शेतावरती अगदी कमी वेळेत फवारणी करणे शक्य झाले आहे.

 

तर, ड्रोन साठी कृषि विभागामार्फत आता अनुदान देण्यात येणार आहे आणि यासाठी महाडीबीटी पोर्टल वर इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी / शेतकरी यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.  (MahaDBT Drone Applications)

 

ड्रोन साठी खालील प्रमाणे अनुदान देय असणार आहे (MahaDBT Drone Applications)

 

1. वैयक्तिक शेतकरी (इतर) यांना एकूण रकमेच्या 40% किंवा जास्तीत जास्त 4 लाख रुपये अनुदान देय असेल

2. वैयक्तिक शेतकरी (अजा/अज/लहान सीमान्त शेतकरी/महिला) यांना एकूण रकमेच्या 50% किंवा जास्तीत जास्त 5 लाख रुपये अनुदान देय असेल

2. शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था यांना एकूण रकमेच्या 40% किंवा जास्तीत जास्त 4 लाख रुपये अनुदान देय असेल

3. कृषि व तत्सम पदवी धारकांना एकूण रकमेच्या 50% किंवा जास्तीत जास्त 5 लाख रुपये अनुदान देय असेल

 

ड्रोन साठी ऑनलाइन अर्ज?

 

ड्रोन साठी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहेत. त्यासाठी आपण महाडीबीटी पोर्टल वर जाऊन आपला अर्ज सादर करू शकता.  MahaDBT Drone Applications

1. महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून अर्ज करा हा पर्याय निवडावा

2. पुढे कृषि यांत्रिकीकरण घटक निवडावा

3. पुढे भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र पर्याय निवडून किसान ड्रोन पर्याय निवडावा आणि अर्ज सादर करावा. 

 

Kisan Drone Applications

 

ड्रोन इतर माहिती पत्रक 

ड्रोन मार्गदर्शक सूचना : पहा

 

ड्रोन महाडीबीटी अर्ज बाबत परिपत्रक : पहा

 

 

error: Content is protected !!
Created with ❤