Nafed Chana Procurement : राज्यात कमी बाजारभावामुळे अडचणीत सापडलेल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार आज दिनांक 01/03/2026 पासून नवीन हरभऱ्याची नोंदणी व खरेदी सुरू झाली आहे.
हमीभावामुळे शेतकऱ्यांना आधार यंदा नवीन हरभऱ्यासाठी शासनाने 5875 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव निश्चित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात नवीन हरभऱ्याची आवक वाढू लागली होती. मात्र, खुल्या बाजारात शेतकऱ्यांना 5200 ते 5700 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता. हा दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत होते. शेतकऱ्यांची मागणी नुसार कमी बाजारभावामुळे हरभरा हमीदराने खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करत होते. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेत 1 मार्चपासून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली. (Nafed Chana Procurement)
१ मार्चपासून सुरू होणारी हमीभाव खरेदी प्रक्रिया हरभरा उत्पादकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. बाजारभाव कमी असतानाही शासनाच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नोंदणी कशी करावी? Nafed Chana Procurement
हमीभाव दराने हरभरा विक्री करण्यासाठी शेतकर्यांनी अगोदर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि ही नोंदणी हे आपण 1 मार्च ते 31 मार्च 2026 पर्यन्त ई समृद्धी मोबाइल अॅप्लिकेशन वरून करू शकता. तर, नोंदणी करण्यासाठी आजच e samruddhi अॅप्लिकेशन घ्या आणि आपली नोंदणी पूर्ण करा. (Nafed Chana Procurement)
ई समृद्धी मोबाइल अॅप्लिकेशन : येथून डाऊनलोड करा
