Namo Shetkari Yojana : देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (Namo Shetkari Yojana) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य सरकार हे देखील केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील (Namo Shetkari Yojana) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळत आहेत. Namo Shetkari Yojana
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी च्या निकषानुसार च ही योजना राज्यात राबविली जात आहे त्यामुळे या योजनेला राज्या मध्ये “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” (Namo Shetkari Yojana) असे नाव देण्यात आले आहे.
तसेच, या योजनेचा अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नमो शेतकरी योजनेच्या पुढील हफ्त्याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. शासनाने पुढील हफ्त्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. Namo Shetkari Yojana
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचा (माहे ऑगस्ट २०२५ ते नोव्हेंबर २०२५) लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी १ हजार ७७४ कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यामुळे येत्या तीन चार दिवसांत हा हफ्ता देखील वितरित होईल, अशी शक्यता आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, पाचवा हप्ता, सहावा हप्ता तसेच सातवा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. त्यांनतर आता आठवा हफ्ता वितरणासाठी निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे. Namo Shetkari Yojana
* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?
