पीक स्पर्धा खरीप हंगाम 2023 | अर्ज, समाविष्ट पीक, पात्रता, फिस, बक्षिसाचे स्वरूप, अर्ज करण्याची अंतिम मुदत, सविस्तर माहिती | Pik Spardha Krushi Vibhag 2023
Pik Spardha: राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
यापूर्वी पिकस्पर्धा (Pik Spardha) तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरावर राबविण्यात येत होती. तालुका पातळीवरील पीकस्पर्धेसाठी सर्व इच्छुक शेतक-यांना भाग घेता येत होता. जिल्हा पातळीवरील स्पर्धेत पूर्वी कधीही तालुका स्तरावरील स्पर्धेत प्रथम तीन आलेले शेतकरी पात्र होते. राज्य पातळीवरील स्पर्धेत यापूर्वी कधीही जिल्हा स्तरावरील स्पर्धेत प्रथम तीन आलेले शेतकरी पात्र होते. त्यामुळे सद्यस्थितीत सदरच्या योजनेमध्ये शेतकर्याला राज्यस्तरावरील सर्वोच्च पारितोषिक मिळविण्यासाठी स्वतःचे शेतात तीन वर्ष सातत्याने तेच पिक घ्यावे लागते, उत्पादकतेत सातत्य राखावे लागते, दुर्देवाने अवकाळी आपत्कालीन / नैसर्गिक आपत्तीसारखी परिस्थिती उद्भवल्यास उत्पादकतेतील घट शेतक-यांना नाउमेद करते. एकुणतः या बाबी टाळण्यासाठी शेतक-यांना सहभागी होता यावे व एकाच वर्षात त्या पिकाच्या येणा-या उत्पादकतेवर स्पर्धेमध्ये सहभागी होता यावे, या उद्देशाने यापुर्वीच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात येत आहे. (Pik Spardha)
यापुढे सदरची स्पर्धा (Pik Spardha) राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्रपणे आयोजित न करता एकाच वर्षात तालुकास्तरावर आयोजित करावयाची आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
विविध स्तरावरील पिकस्पर्धेसाठी (Pik Spardha) विहीत करण्यात आलेल्या निकषामध्ये कालानुरूप बदल करण्याची आवश्यकता लक्षात घेवून पिकस्पर्धेच्या समित्या, पात्रतेचे निकष, विविध प्रपत्रे, पिकस्पर्धा विजेते संख्या, स्वरुप, बक्षिस रक्कम इत्यादी बाबींमध्ये बदल करण्यात आला आहे.
पीकस्पर्धेतील पीके (Pik Spardha)
पीक स्पर्धेमध्ये खालील पिकांचा समावेश आहे :
खरीप पीके : भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल (एकूण ११ पिके)
रब्बी पीके : ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस (एकूण ०५ पिके)
पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी पात्रता निकष
- स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे.
- स्पर्धेत भाग घेणा-या शेतकर्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
- पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरेता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत ४० आर (१ एकर) क्षेत्रार सलग लागवड असणे आवश्यक आहे.
- भात पिकाच्या बाबतीत ज्या स्पर्धक शेतकऱ्यांचे पिकस्पर्धेसाठी निवड केलेले क्षेत्र २० आर ते ४० आर (१ एकर) पर्यंत असेल ते संपूर्ण क्षेत्र पिकस्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.
- इतर सर्व पिकांचे बाबतीत सलग ४० आर (१ एकर) पेक्षा जास्त क्षेत्र असल्यास स्पर्धक शेतकऱ्यांकडे पुढील दोन पर्याय असतील. अ) स्पर्धेच्या सुरुवातीस संपूर्ण क्षेत्रापैकी १ एकर क्षेत्र पिकस्पर्धेसाठी निश्चित करून देऊ शकतात किंवा ब) संपूर्ण क्षेत्र पिकस्पर्धेसाठी घोषित करू शकतात. मात्र यासाठी अर्जासोबत पिकस्पर्धेसाठी घोषीत क्षेत्र नकाशावर चिन्हांकित करून जोडणे आवश्यक राहील.
- पीकस्पर्धेसाठी जेवढे अर्ज प्राप्त होतील ते सर्व शेतकरी पीकस्पर्धेकरता पात्र राहतील. स्पर्धेत सहभागी होणारा शेतकरी तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील बक्षिसासाठी पात्र असल्याने तालुक्यामधून पिकस्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान अर्ज संख्येची अट ठेवण्यात आली नाही.
- मुद्दा क्र. 6 नुसार किमान अर्ज संख्येची अट काढून टाकली असली तरी तालुक्यात लागवड असलेल्या व पिक स्पर्धेमध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व पिकांचे पिकस्पर्धेकरीता पिकनिहाय किमान ५ अर्ज येतील याची जबाबदारी तालुका कृषी अधिकारी यांची राहील.
- पिकस्पर्धेमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शेतकर्याला पुढील पाच वर्ष त्याच पिकाकरिता पिकस्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
पीकस्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी खालील कागदपत्रांची पूर्तता संबंधीत तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे करावयाची आहे.
- विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-आ)
- ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
- ७/१२, ८-अ चा उतारा
- जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)
- पिकस्पर्धेसाठी शेतकर्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा
- बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत
अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख
निरनिराळ्या हंगामामध्ये पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख खालील प्रमाणे राहिल. (Pik Spardha)
खरीप हंगाम :
मूगव उडीद पिक : ३१ जुलै
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल : ३१ ऑगस्ट
रब्बी हंगाम :
ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस : ३१ डिसेंबर
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क
पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु. ३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० राहिल. (Pik Spardha)
पीक स्पर्धा विजेते बक्षिसाचे स्वरूप
प्रपत्रे डाऊनलोड करा
पीक स्पर्धा अर्जाचा नमूना (प्रपत्र अ ) : डाऊनलोड करा
पीक लागवड व खर्चाचा तपशील (प्रपत्र ब 1) : डाऊनलोड करा
पीक कापणीचा तपशील (प्रपत्र ब 2) : डाऊनलोड करा
पीक स्पर्धेतून माघार घ्यावयाच्या अर्जाचा नमूना (प्रपत्र उ) : डाऊनलोड करा
पीक स्पर्धा मार्गदर्शक सूचना 2023 : डाउनलोड करा
अधिक वाचा :
* बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार
* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना
* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा
* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत