Snail Control: असे करा पिकांचे गोगलगायी पासून संरक्षण | गोगलगाय नियंत्रणासाठी करावयाच्या खात्रीशीर उपाययोजना | How to protect crops from Snails?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

गोगलगायी (Snail Control) जून ते सप्टेंबर या कालावधी मध्ये अत्यंत सक्रिय असतात आणि अनुकूल वातावरण आणि खाद्याच्या अमाप उपलब्धतेमुळे त्यांची वाढ झपाट्याने होत असल्याने शेतकऱ्यांपुढे त्यांच्या रूपाने नवे संकट उभे राहते. ही कीड बहुविध पिकांना उपद्रव करत असल्यामुळे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे गरजेचे आहे.

 

Snail Control gogalgay niyantran

 

गोगलगाय ही बहुभाक्षिक कीड असून ती विशेषतः रोपवस्थेत पिकाचे पाने खाऊन अतोनात नुकसान करते. तसेच, ही कीड निशाचर असल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडून रोपची पाने खाते. गोगलगाय नियंत्रण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण खालील उपाययोजना करू शकता.  (Snail Control)

 

 

1. गोळा करून नष्ट करणे

गोगलगाय ही निशाचर कीड आहे त्यामुळे दिवसा ही सहसा शेतकर्‍यांना शेतात आढळून येत नाही तर ही कीड सकाळी 5:30 ते 8:00 च्या दरम्यान शेतात पहायला मिळेल. त्यावेळी आपण गोगलगायी गोळा करून मिठाच्या किंवा साबणाच्या पाण्यात टाकून त्या नष्ट कराव्यात. तर, यावेळी गोळा करत असताना शेतकर्‍यांनी हातात प्लॅस्टिक हातमोजे घालावीत कारण ज्या गोगलगायी च्या प्रजाती महाराष्ट्रात आढळून आल्या आहेत त्यापैकि काही ह्या विषारी आहेत त्यामुळे गोळा करत असताना ही काळजी घ्यावी.

 

 

 

2. बारदाना/पोते हे गुळाच्या द्रावणात भिजून शेतात ठेवणे

शेतातील गोगलगायी ह्या एक ठिकाणी आकर्षित करून नष्ट करण्यासाठी ही पद्धत वापरली जाऊ शकते. यामध्ये 20 ते 25 बारदाना/पोते हे गुळाच्या द्रावणात भिजून घ्यावयाचे आहेत आणि हे पोते शेतात बांधाच्या बाजूने जागोजागी ठेवायचे आहेत. यामुळे गोगलगायी ह्या त्याकडे आकर्षित होतील आणि त्याठिकाणी एकत्र येऊन बसतील त्यावेळी आपण त्या गोळा करून मिठाच्या किंवा साबणच्या पाण्यात टाकून नष्ट करायच्या आहेत.

 

 

3. बांधाभोवती चुन्याचा पट्टा करणे

गोगलगायी ह्या शेतात येऊ नयेत यासाठी हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये आपल्याला चुन्याचा जाड अशा आकाराचा पट्टा हा आपल्या शेताच्या भोवती तयार करायचा आहे. त्यामुळे, जेंव्हा गोगलगाय ही चुन्याच्या संपर्कात येते त्यावेळी तिचा जो स्त्राव आहे तो पूर्ण बाहेर येऊन ती जागीच नष्ट होते. यामध्ये चुन्याचा पट्टा जो ओढणार आहोत तो जाड ठेवावा. (Snail Control)

 

 

4. रासायनिक पद्धत

वरील पद्धतीने गोगलगायी नियंत्रण शक्य नसेल तर, आपण त्यांच्या नियंत्रणासाठी शिफारस करण्यात आलेले रासायनिक औषध ‘ मेटाल्डिहाइड ’ हे वापरू शकता. हे बाजारामध्ये स्नेल किल या व्यापारी नावाने उपलब्ध आहे. हे औषध प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पसरवून टाकायचे आहे. त्यानंतर गोगलगायी ह्या त्याकडे आकर्षित होऊन त्या औषधाच्या संपर्कात आल्या की जागीच नष्ट होती.

 

तसेच, हे औषध पाण्यामध्ये विरघळून त्याची पेस्ट करून हे मुरमुरे/कळणा/भरडा यासोबत मिश्रण करून शेतात टाकल्यानंतर देखील चांगला परिणाम पहायला मिळेल. फक्त यावेळी शेतातील पाळीव प्राणी, पशू पक्षी हे यापासून दूर राहतील अशी काळजी घ्यावी. (Snail Control)

 

 

5. शेतकर्‍यांनी केलेले इतर प्रभावी उपाय

गव्हाच्या किंवा भाताच्या कोंडयामध्ये थायमेथोक्साम 25% हे कीटकनाशक चांगल्या प्रकारे मिसळून हे शेतात टाकल्याने आणि गोगलगाय याच्या संपर्कात आल्याने नष्ट झाल्या आहेत. तसेच, या ठिकाणी काही शेतकर्‍यांनी इतर कीटक नाशक फिप्रोनिल, इमिडाक्लोप्रिड हे देखील वापरुन वरील पद्धतीने गोगलगाय नियंत्रण केले आहे. Snail Control

 

snail control

 

 

 

 

 

 

अधिक वाचा :

* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध

* PoCRA 2.0 Update विदर्भातील “या” जिल्ह्यांचा समावेश असणार

* मंत्रिमंडळ बैठकीतील हेमोठे निर्णय

* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा

* सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप 10 वाण

* “या” शेतकर्‍यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता

error: Content is protected !!