Posted in

PM Kisan Yojana : नवीन शेती घेतली आहे… तर, आता पीएम किसान योजनेचा लाभ घेता येईल का? पहा काय आहेत नियम

Pm kisan yojana नवीन शेती घेतली आहे... तर आता पीएम किसान योजनेचा लाभ घेता येईल का पहा काय आहेत नियम
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.9/5 - (7 votes)

PM Kisan Yojana : देशभरात केंद्र सरकार कडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना (PM Kisan Status) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

 

तसेच, महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजना नुसार राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधि योजना सुरू केलेली आहे. यात वार्षिक रु. 6000/- ची मदत देण्यात येत आहे.  PM Kisan Yojana

 

परंतु, या योजनेमधील अटी व नियमा मुळे बरेच शेतकरी हे आज देखील या योजने मध्ये पात्र होऊ शकत नाहीयेत कारण या योजने मध्ये पात्र होण्यासाठी तुमच्या नावावरती शेतजमीन कधी झाली आहे आणि कोणत्या कारणांमुळे झाली आहे हे देखील महत्वाचे आहे.

 

काय आहे नियम? PM Kisan Yojana

 

1. पीएम किसान सन्मान निधी योजना PM Kisan Yojana मध्ये पात्र होण्यासाठी लाभार्थी शेतकरी यांच्या नावावरती 01 फेब्रुवारी 2019 च्या अगोदर पासून शेतजमीन असणे आवश्यक आहे. म्हणजे शेत जमिनीचा फेरफार हा 01 फेब्रुवारी 2019 च्या अगोदरचा असणे आवश्यक आहे.

 

2. 01 फेब्रुवारी 2019 च्या नंतर आपण जमीन खरेदी केली असेल तर आपण या योजनेमध्ये अपात्र ठरविले जातात. PM Kisan Yojana

 

3. अपवाद, 01 फेब्रुवारी 2019 च्या नंतर आपल्या नावावर जमीन झाली असेल आणि ही जमीन आपल्याला वारस हक्काने मिळाली असेल आणि त्याची नोंद आपल्या फेरफार मध्ये “वारस हक्काने” अशी झाली असेल तर मात्र आपण या योजने मध्ये पात्र ठरू शकता.

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!