Ration Card Mobile Link : आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती … हे काम करून घ्या?
Ration Card Mobile Link : राज्यातील रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने चोख उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानुसार, त्यांनी आता रेशन दुकानांवर धान्य आल्याचा व दुकानावरून धान्य घेतल्याचा मेसेज संबंधित लाभार्थ्याच्या नोंदणी केलेल्या मोबाइलवर येणार आहे.
त्यासाठी लाभार्थ्यांनी रेशन दुकानात आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक केले आहे. रेशन दुकानातील धान्य अनेकदा काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार कायम बंद व्हावा, यासाठी शासनाचे सर्वंकष प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व रेशनकार्ड हे आधार आणि मोबाइल क्रमांकाशी लिंक करण्यात येत आहेत.
कसा मिळणार मेसेज? (Ration Card Mobile Link)
शासन हे ‘एसएमएस गेटवे‘ या ‘सॉफ्टवेअर‘चा वापर करून रेशनकार्ड धारकांच्या मोबाइल नोंदणी केलेल्या क्रमांकावर गोदामातून रेशन दुकानात किती धान्य कधी पाठविण्यात आले, याची माहिती दिली जाणार आहे. (Ration Card Mobile Link)
लाभार्थ्याला काय करावे लागणार?
लाभार्थ्याला आपला वापरात असेलेला मोबाईल क्रमांक हा रेशनकार्डशी जोडून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लाभार्थी हा धान्य मिळणाऱ्या रेशन दुकानात जाऊन आपला मोबाइल क्रमांक हा रेशन कार्ड शी लिंक करून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो,अशी माहिती प्राप्त झाली.
Tags : Ration Card Mobile Link, ration card status, ration card online check, ration card list, ration card aadhar link,
* पोक्रा प्रकल्प टप्पा-2 अमलबजावणी सुरू….
* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..
* 16 डिसेंबर पासून राज्यात “अग्रिस्टॅक” योजना होणार सुरू
* हरभरा, गहू, कांदा विम्या साठी 15 डिसेंबर पर्यन्त मुदत
* आता व्हॉट्सॲप वर मिळवा पीक विमा स्टेटस, पीक नुकसान सूचना सद्यस्थिती
* जुलै ते सप्टेंबर 2024 अतिवृष्टी मदत वाटप सुरू…… असे चेक करा आपले पेमेंट स्टेटस
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान