Krishi Vibhag Maharashtra Shasan Jobs | कृषि विभाग महाराष्ट्र शासन पद भरती जाहिरात वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक भरती 2023
विभागीय कृषी सह-संचालक, नागपुर, कोंकण आणि कोल्हापूर या कार्यालयाच्या आस्थापनेवरील दुय्यम सेवा निवड Krishi Vibhag Maharashtra Shasan Jobs मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील वरिष्ठ लिपीक आणि सहाय्यक अधीक्षक ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात सन – २०२३ हि राज्य शासनाच्या कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेले विभागीय कृषी सहसंचालक, नागपुर, कोंकण आणि कोल्हापूर व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक पदे सरळसेवेने भरण्याकरता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन Online पद्धतीने दिनांक ६ एप्रिल २०२३ पासून ते दिनांक २० एप्रिल 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
Krishi Vibhag Maharashtra Shasan Jobs वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक या पदांकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषिक उमेदवार हे अर्ज करू शकतील. सदर पदांवरील भरती करता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या संकेतस्थळावर यथाअवकाश प्रसिद्ध करण्यात येईल.
रिक्त पदांचा तपशील
विभाग : नागपुर
विभाग : कोंकण
विभाग : कोल्हापूर
शैक्षणिक अर्हता व अनुभव
सहाय्यक अधीक्षक करिता :
- सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी.
- पदवी नंतर मसूदा लेखन व पत्र व्यवहारा च्या प्रत्यक्ष कामाचा किमान 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असेल.
- विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
वरिष्ठ लिपीक करिता :
- महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी आवश्यक.
- व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किवा पदवीनंतर मसूदा लेखन व पत्र व्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य असेल.