PM KISAN : पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान योजनांवर कृषी विभागाकडून बहिष्कार | अपुर्‍या सोयी सुविधांमुळे निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

PM KISAN : पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान योजना ह्या सध्या कृषि विभागाकडून राबविण्यात येत असून कृषि विभागाला देण्यात येणार्‍या अपुर्‍या सोयी सुविधांमुळे या योजनेवर 1 जुलै पासून बहिष्कार टाकण्यात येत आहे.

 

Pm Kisan Scheme

 

पूर्वी पीएम किसान योजना ही महसूल विभागाकडून राबविण्यात येत होती त्यानंतर ही योजना कृषि विभागाकड हस्तांतरित करण्यात आली. परंतु, त्या सोबत शासनाने कृषि विभागाला मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा, प्रशिक्षण देणे आवश्यक होते तसे न करताच योजना कृषि विभागाकडे देण्यात आली. PM KISAN

 

 

तर ही योजना राबविताना या योजनांच्या अंमलबजावणीसाठी डाटा एंट्री ऑपरेटर, मूलभूत प्रशिक्षण, कार्यालयीन इतर आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अधिकारी/कर्मचारी यांना अनेक अडचणी येत आहेत. PM KISAN परिणामी त्यांना शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

 

 

दरम्यान, या सुविधांसाठी दिनांक 01 जुलैपासून योजनेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 

 

error: Content is protected !!