Godown Subsidy Scheme : कृषि विभागामार्फत गोदाम आणि बिजप्रक्रिया प्रकल्प उभारणी साठी अर्ज घेणे सुरू | किती असेल अनुदान रक्कम?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Godown Subsidy Scheme : राज्यातील शेतकर्‍यांना कृषि विभागामार्फत अन्न व पोषण अभियान (कडधान्य) व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात गोदाम बांधकामासाठी आणि बिजप्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्याकरिता अर्ज स्वीकारन्यास सुरवात झाली आहे.

 

Godown Subsidy Scheme
Godown Subsidy Scheme

 

कृषि विभागाकडून शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान (कडधान्य) व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी (Godown Subsidy Scheme) प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 

 

तसेच, शेतकर्‍यांना बिजप्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. (Godown Subsidy Scheme)

 

 

सदरील योजना बँक कर्जाशी निगडित असून इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज सादर करावेत. यासाठी वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषानुसार डिझाइन, स्पेसिफिकेशन, खर्चाचे अंदाजपत्रकाप्रमाणे बांधकाम या आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.

 

 

पूर्वसंमती देण्यात आलेल्या कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पद्धतीने वर्ग करण्यात येईल. योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक संघ, कंपन्यांनी घ्यावा, असे आवाहनही कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. (Godown Subsidy Scheme)

 

 

इच्छुक शेतकऱ्यांनी सातबारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील आदी कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडे ३१ जुलै २०२४ पूर्वी सादर करावेत, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

 

अर्ज कोठे करावा? (Godown Subsidy Scheme)

 

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय येथे भेट द्यावी.

 

अर्ज करणायची अंतिम मुदत? : ३१ जुलै २०२४

error: Content is protected !!