Fundkar Falbag Lagvad Yojana : स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | सोडतीनंतर महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावयाची कागदपत्रे
Fundkar Falbag Lagvad Yojana : सन 2024-25 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास मान्यता प्राप्त झाली असून महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत अर्ज सुरू झाले आहेत. आणि लवकरच फळबाग सोडत यादी ही काढण्यात येणार आहे. तर, सर्व इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर करावेत.
अर्जदारांची नोंदणी :-
सर्व इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणीकरावी लागेल आणि आपल्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे तथापी, सदर प्रक्रिया शेतकर्यांना एकदाच करावी लागणार आहे.
संकेतस्थळ- महाडीबीटी पोर्टलचे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच ठिबक सिंचन या बाबी करीता https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेत स्थळावर वेगवेगळे अर्ज करावेत.
कागदपत्रे अपलोड करणे: Fundkar Falbag Lagvad Yojana
संगणकीय सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची ज्या बाबीसाठी निवड झाली असेल त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे महा-डीबीटी पोर्टलवर सादर करण्याबाबत त्यांच्या मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे कळविण्यात येईल.
शेतकऱ्यांना सोडतीमध्ये निवड झाल्यानंतर लघु संदेशामध्ये नमुदप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणेकरीता ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास त्यांना मोबाईलद्वारे लघुसंदेश पाठवुन आणखी ०३ दिवसांची मुदत दिली जाईल आणि या मुदतीत जे शेतकरी कागदपत्र अपलोड करणार नाहीत त्यांचे अर्ज रद्द करण्यात येईल
सोडतीनंतर महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावयाची कागदपत्रे :-
- ७/१२ उतारा
- ८ – अ उतारा
- सामाईक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने इतर खातेदारांचे सहमती पत्र सादर करणेबंधनकारक असुन ते विहित नमुन्यात अपलोड करावेत.
- आधार कार्ड
- आधार लिंक बँक खाते क्रमांक
- कागदी लिंबू,संत्रा व मोसंबी या लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीकरीता माती परिक्षण अहवाल कागदपत्रकांबरोबर अपलोड करावा.
- फळबाग हमीपत्र :डाउनलोड करा