Posted in

Sugarcane Harvester Lottery List : ऊस तोडणी यंत्र निवड यादी 11 ऑगस्ट 2025 | सर्व जिल्हयांची सोडत यादी पहा

Sugarcane harvester lottery list ऊस तोडणी यंत्र
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4.5/5 - (4 votes)

Sugarcane Harvester Lottery List : शेतकरी बांधवानो आता महाराष्ट्र शासन राज्यातील सर्व इच्छुक शेतकर्‍यांना उस तोडणी यंत्र खरेदी करण्यास अनुदान देत आहे. तर कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे शेतकर्‍यांना उस तोडणी यंत्रास किती अनुदान देण्यात येणार आणि यासाठी कोठे आणि कसा अर्ज करायचा व या ऊस तोडणी यंत्राची सोडत यादी कशी पहायची हे आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात.

 

कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे विविध कृषि यंत्र आणि औजारे यांना अनुदान दिले जाते आणि यामध्ये विविध कृषि यंत्र औजारे जसे की पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. परंतु, आता महाडीबीटी पोर्टल द्वारे सन 2025-26 करिता ऊसतोडणी यंत्रास देखील अनुदान देण्यात येणार आहे आणि यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. Sugarcane Harvester Lottery List

 

मा. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना राज्यस्तरीय मंजूरी समितीचे दि.२६/०५/२०२५ रोजीचे इतिवृत्तानुसार ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पासाठी (“Mechanized Harvesting in Sugarcane”२०२२-२३) रू.२३२.४३ कोटी तरतूद करून प्रकल्पास सन २०२५-२०२६ करीता मुदतवाढ दिलेली आहे. त्यास अनुसरून साखर आयुक्त, पुणे यांनी प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये ऊस तोडणी यंत्रांना अनुदान देणेबाबतच्या रू. २३२.४३ कोटी इतक्या रकमेच्या प्रकल्पास मुदतवाढ व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र केंद्र शासनाच्या दि.२१/०४/२०२५ च्या पत्रातील निर्देशानुसार First Come, First Serve (FCFS) पद्धतीने लाभार्थी निवड करणे बाबत कृषि विभागाने MAHA-DBT बाबत धोरण स्वीकारलेले आहे, त्याप्रमाणे ऊस तोडणी यंत्र Sugarcane Harvester अनुदान प्रकल्पासाठी देखील सदर धोरण अंगिकारण्यात यावे. Sugarcane Harvester Lottery List

 

तर, First Come, First Serve (FCFS) प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य पद्धतीने लाभार्थी निवड करणे करिता ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू झालेले होते तरी सर्व इच्छुक शेतकरी बांधवांनी  कृषि विभागाच्या MAHA-DBT पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करून घ्यावेत असे आवाहन देखील करण्यात आले होते.  तर, आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी ऊस तोडणी यंत्राची सोडत काढण्यात आलेली असून ही निवड यादी आपण खालील लिंक वर भेट देऊन पाहू शकता.  Sugarcane Harvester Lottery List

 

 

ऊस तोडणी यंत्र अनुदान (Sugarcane Harvester Lottery List)

 

अनुदानाची रक्कम : किमतीच्या 40% किंवा जास्तीत जास्त 35 लाख रुपये असेल

अमलबजावणी विभाग : कृषि विभाग/सहकार विभाग

कृषि विभाग योजना : राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन Online Application

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ/वेबसाइट : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल 

 

दि. 11 ऑगस्ट 2025 ची सोडत यादी पहाण्यासाठी खालील ठिकाणी भेट द्या 

 

ऊस तोडणी यंत्र निवड यादी : या ठिकाणी पहा 

 

error: Content is protected !!