Shetkari Karjamafi : राज्य सरकारने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी, तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली होती. २ लाखांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्यांसाठी ‘एकवेळ समझोता’ (OTS) योजना आणली आहे. पहिल्या टप्प्यात २ लाखांच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांची यादी इन्कम टॅक्स विभागाकडे पाठवण्यात आली होती, ज्यातून ९४ हजार इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी बाहेर पडले आहेत. (Shetkari Karjamafi)
तर, आता राज्य सरकारच्या महत्वकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून तब्बल ९४ हजार आयकरदाते शेतकरी अपात्र ठरले आहेत. तर या योजनेतील उर्वरित १६ लाख ९४ हजार पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात येत्या मंगळवारी एकाचवेळी तब्बल सात हजार कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचा पुन्हा पीककर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती सहकार विभागील सूत्रांकडून प्राप्त होत आहे. (Shetkari Karjamafi)
या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (प्रमाणीकरण) अनिवार्य करण्यात आले असून आतापर्यंत १० लाख शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. येत्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट डीबीटी (DBT) द्वारे सुमारे ७ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले जातील. (Shetkari Karjamafi)





