Posted in

Land Titling Act : ‘आधी मोजणी, मग नोंदणी, नंतर फेरफार’ | डिसेंबरमध्ये येणार नवा जमीन विषयक कायदा

Land Titling Act
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
1/5 - (1 vote)

Land Titling Act : आज रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आलेले होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (Land Titling Act)

 

या कार्यक्रमात, राज्यातील जमिनींच्या व्यवहारात पारदर्शकता, अचूक मालकी नोंद आणि वादमुक्त व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार डिसेंबरच्या अधिवेशनात ‘आधी मोजणी, मग नोंदणी आणि त्यानंतर फेरफार’ या तत्त्वावर आधारित नवा ‘लँड टायटलिंग कायदा’ आणणार असल्याची मोठी घोषणा माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी येथे केली. याचबरोबर कुळ, वहिवाटदार आणि देवस्थानांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी ‘देवस्थान जमीन इनाम कायदा’ देखील लवकरच लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Land Titling Act)

 

महसूल विभाग हा सामान्य नागरिकांच्या जीवनाशी थेट जोडलेला असून, शासनाची सेवा नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी भूमिका मांडताना बावनकुळे म्हणाले, “लोकांनी सरकारी कार्यालयांची पायरी चढण्याऐवजी सरकारी कार्यालयेच लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत.”  (Land Titling Act)

 

 

 

 

error: Content is protected !!
Created with ❤