Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana : राज्यामध्ये मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास मान्यता प्राप्त झालेली असून महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू आहेत. स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मध्ये शेतकरी हे आंबा, लिंबू, चिकू, नारळ, चिंच, आवळा, पेरु, संत्रा, मोसंबी, जांभूळ, इत्यादि फळपिकांचा लाभ घेऊ शकतात. तर, या योजनेमध्ये पात्रता, अनुदान हे आपण पाहुयात.
योजनेची लाभार्थी पात्रता (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana)
खालील अटींची पूर्तता करणारे होतकरी योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील :
1. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जे शोतकरी फळबाग लागवडी करीता पात्र ठरु शकत नाहीत असे शेतकरी. या योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana
2. शेतकऱ्याच्या स्वत: च्या नावे ७/१२ असणे आवश्यक आहे. जर ७/१२ उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील. सोबत विहित प्रपत्रातील नमुना जोडला आहे.
3. जमिन कुळ कायदयाखाली येत असल्यास ७/१२ च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक राहील.
4. यापुर्वी महाडिबीटीवर प्राप्त झालेल्या अर्जांमधून सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येईल.
लाभ क्षेत्र मर्यादा
1. या योजने अंतर्गत फळबाग लागवडीकरीता कोकण विभागासाठी किमान ०.१० हेक्टर ते कमाल १०.०० हेक्टर तर उर्वरीत विभागासाठी किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर क्षेत्र मर्यादा अनुज्ञेय राहील. Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana
2. कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करु शकेल.
3. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर योजनेचा दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरीत क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमूधन लाभ घेता येईल.
4. लाभार्थ्याने यापूर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड वा अन्य योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरीत कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभार्थी पात्र राहील.
अर्जदारांची नोंदणी
1. सर्व इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि आपल्या आघार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे तथापी, सदर प्रक्रिया शेतकर्यांना एकदाच करावी लागणार आहे. (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana)
2. संकेतस्थळ – महाडीबीटी पोर्टलचे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच ठिबक सिंचन या बाबी करीता https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेत स्थळावर वेगवेगळे अर्ज करावेत.
महाडीबीटी संगणकीय सोडत
शेतकऱ्यांनी अर्ज केलेल्या विविध बाबींची महाडीबीटी पोर्टलवरील तालुका पातळीवर संगणकीय सोडत काढण्यात येईल तथापि ज्या प्रवर्गासाठी तालुका स्तरावर पुरेसा आर्थिक लक्षांक उपलब्ध होणार नाही अशावेळी फेरवितरण या सुविधेचा वापर करुन जिल्हा अधिक्षक कृषि अधकिरी स्तरावरुन तालुक्यांना लक्षांक फेरवाटप केला जाईल.
संगणकीय सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे त्यांच्या निवडीबाबत अवगत करण्यात येईल. त्यामुळे शेतक-याने सेवा केंद्र धारकाचा अथवा अन्य व्यक्तीचा मोबाईल नंबर न देता स्वत:चा मोबाईल क्रमांक नमूद करावा. Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana
कागदपत्रे अपलोड करणे
संगणकीय सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची ज्या बाबीसाठी निवड झाली असेल त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे महा-डीबीटी पोर्टलवर सादर करण्याबाबत त्यांच्या मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे कळविण्यात येईल.
शेतकऱ्यांना सोडतीमध्ये निवड झाल्यानंतर लघु संदेशामध्ये नमुदप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणेकरीता ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास त्यांना मोबाईलद्वारे लघुसंदेश पाठवुन आणखी ०३ दिवसांची मुदत दिली जाईल आणि या मुदतीत जे शेतकरी कागदपत्र अपलोड करणार नाहीत त्यांचे अर्ज रद्द करण्यात येईल (Bhausaheb Fundkar Falbag Yojana)
निवड यादी
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ची ऑगस्ट महिन्याची निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी आपण खालील लिंक वरुण आपल्या जिल्ह्याची निवड यादी पाहू शकता. Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana
जिल्हा : अकोला
जिल्हा : अमरावती
जिल्हा : अहिल्यानगर
जिल्हा : धाराशीव
जिल्हा : छत्रपती संभाजीनगर
जिल्हा : कोल्हापूर
जिल्हा : गडचिरोली
जिल्हा : गोंदिया
जिल्हा : चंद्रपूर
जिल्हा : जळगाव
जिल्हा : जालना
जिल्हा : ठाणे
जिल्हा : धुळे
जिल्हा : नंदुरबार
जिल्हा : नागपूर
जिल्हा : नांदेड
जिल्हा : नाशिक
जिल्हा : परभणी
जिल्हा : पालघर
जिल्हा : पुणे
जिल्हा : बीड
जिल्हा : बुलढाणा
जिल्हा : भंडारा
जिल्हा : यवतमाळ
जिल्हा : रत्नागिरी
जिल्हा : रायगड
जिल्हा : लातूर
जिल्हा : वर्धा
जिल्हा : वाशिम
जिल्हा : सांगली
जिल्हा : सातारा
जिल्हा : सिंधुदुर्ग
जिल्हा : सोलापूर
जिल्हा : हिंगोली