Crop Insurance: पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा | पीक विमा भरण्यासाठी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र फॉरमॅट
Crop Insurance: सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.१ भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन २०२३-२४ पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या वर्षी खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा (Crop Insurance) योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही ३१ जुलै असून त्यापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे. या वर्षी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना केवळ ‘एक रुपया’ भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे, म्हणजे शेतकर्यांना पीक विमा भरण्यासाठी फक्त 1 रुपया लागणार आहे आणि शेतकरी हिस्स्याची उर्वरित रक्कम ही राज्य शासन भरणार आहे. तर, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी 31 जुलै पूर्वी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे.
पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf : डाऊनलोड करा
अधिक वाचा :
* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा
* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध
* PoCRA 2.0 Update विदर्भातील “या” जिल्ह्यांचा समावेश असणार
* मंत्रिमंडळ बैठकीतील ‘हे‘ मोठे निर्णय
* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा